Andman Nicobar_Chief Sec 
देश

‘Job for Sex’ Case: माजी मुख्य सचिवांच्या घरात सेक्सकांड? SITच्या तपासात धक्कादायक खुलासा

पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड डिलिट करण्यात आल्याचा प्रकारही घडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अंदमान आणि निकोबारचे माजी मुख्य सचिव जितेंद्र नारायण आणि श्रम आयुक्त आर. एल. ऋषी यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला (SIT) सेक्स रॅकेटचे पुरावे मिळाले आहेत. 'जॉब फॉर सेक्स' (Job for Sex) म्हणून चर्चेत आलेल्या या प्रकरणात तपास पथकाला धक्कादायक खुलासा झाला आहे. (Andaman Job for Sex Racket Unfolds many things revealed by SIT Probe)

एसआयटीच्या चौकशीतून माहिती समोर आली की, नोकरीच्या आमिषानं माजी मुख्य सचिवांच्या घरी २०हून अधिक महिलांना आणण्यात आलं होतं. सेक्सच्या बदल्यात त्यांना या ठिकाणी नोकरी देण्यात आली होती. याप्रकरणात एसआयटीनं मुख्य साक्षीदारांचे जबाब नोंदवले, यामध्ये हा धक्कादायक खुलासा झाला आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

दरम्यान, २१ वर्षीय महिलेचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाल्यानंतर केंद्रानं नुकतचं जितेंद्र नारायण यांना तत्काळ प्रभावानं निलंबित केलं होतं. जितेंद्र नारायण हे Arunachal Pradesh-Goa-Mizoram and Union Territory (AGMUT) केडरच्या सन १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. चौकशीनंतर आता नारायण यांना २८ ऑक्टोबर रोजी एसआयटीसमोर हजर व्हावं लागणार आहे. यासाठी कोलकाता हायकोर्टानं ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड केलं डिलीट

पोर्ट ब्लेअरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं इंडियन एक्सप्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं की, दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सीडीआर तसेच मुख्य सचिवांच्या निवासस्थानी असलेल्या सीसीट्वीव्हीचं फुटेज हार्टडिस्कमधून डिलिट करण्यात आलं होतं.

आरोपांचं केलं खंडण

पण आपल्यावरील आरोप जितेंद्र नारायण यांनी नाकारले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि अंदमान आणि निकोबारच्या प्रशासनाला पत्र लिहून आपल्याविरोधात कट रचल्याचा दावा केला आहे. एफआयआरमध्ये दिलेल्या दोन तारखांपैकी एका तारखेला आपण पोर्ट ब्लेअरमध्ये नव्हतो, असं सांगत त्यांनी याला कोर्टात आव्हानही दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT