world record holder 
देश

World Record: 4 महिन्याच्या कैवल्याची कमाल, नावावर केला जागतिक विक्रम; जाणून घ्या तिची हुशारी!

चार महिन्याच्या बाळाने कमाल केली आहे. त्यांने आपल्या नावावर जागतिक विक्रम केलाय. (four month old baby Kaivalya is now a world record holder)

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- चार महिन्याच्या बाळाने कमाल केली आहे. त्यांने आपल्या नावावर जागतिक विक्रम केलाय. चार महिन्याच्या बाळाने १०० पेक्षा अधिक फ्लॅशकार्ड ओळखून दाखवले आहेत. त्याच्यामुळे त्याच्या या हुशारीची दखल घेत नोबल वर्ल्ड रिकॉर्डने त्याचा सन्मान केलाय. बाळाची हुशारी पाहून अनेकजण आश्चर्यचकित होत आहेत. कारण, केवळ चौथ्या महिन्यात बाळाने चित्र ओळखले आहेत.(Andhra four monthold baby Kaivalya is now a world record holder baby to identify 100 flashcards)

बाळाला १२० फ्लॅशकार्ड दाखवण्यात आले होते. यात १२ फुलं, २७ फळं, २७ भाज्या, २७ प्राणी आणि २७ पक्षांचा समावेश होता. बाळाने हा कारनामा ३ फेब्रुवारी २०२४ रोजी केली आहे. बाळाचे नाव कैवल्या असं असून तिचं कौशल्य तिच्या आईला अगोदर उमगलं. त्यानंतर कैवल्याच्या आई-वडिलांनी तो चित्र ओळखत असल्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो नोबल वर्ल्ड रिकॉर्डला पाठवून दिला.

नोबल वर्ल्ड रिकॉर्डने व्हिडिओ तपासला आणि कैवल्याचे अद्वितीय कौशल्य तपासलं. त्यानंतर कैवल्याला टीमकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे कैवल्याच्या नावावर जागतित विक्रम झाला आहे. चार महिन्यात जागतिक विक्रम कैवल्याने आपल्या नावावर केलाय. त्यामुळे तिचे सर्वच कौतुक होत आहे. शिवाय तिच्या आई-वडिलांना आनंद गगनात मावेनासा झालाय.

कैवल्या आणि तिच्या आई-वडिलांनी पुरस्कार हातात घेऊन फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाळाच्या पालकांनी या उपलब्धीबाबत आनंद व्यक्त केलाय. सर्वांनी पाठिंबा दिल्याबाबत त्यांनी आभार मानले आहेत. तसेच कैवल्याच्या उदाहरणावरुन इतर पालकांना देखील आपल्या मुलाचे कौशल्य ओळखण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT