Bus Accident esakal
देश

आंध्र प्रदेशात भीषण अपघात; बस नाल्यात कोसळल्याने 9 ठार, 22 जखमी

सकाळ डिजिटल टीम

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात (Andhra Pradesh Bus Accident) बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली. आंध्र प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकाचा (APSRTC) बसवरील ताबा सुटल्याने बस नाल्यात पडून तब्बल नऊ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान 22 जण जखमी झाले आहेत.

पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राहुल देव शर्मा यांनी वृत्तसंस्था पीटीआयला फोनवरून दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील अस्वरपेट येथून जांगरेड्डीगुडेमला येथे जात असलेल्या बसमध्ये सुमारे 47 प्रवासी होते. राज्याचे मुख्यमंत्री व्हीईएस जगन मोहन रेड्डी (Y S Jaganmohan Reddy) यांनी मृतांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच त्यांनी जखमींना चांगले उपचार देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान समोरुन येत असलेल्या लॉरीला रस्ता देण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, APSRTC बस चालकाने जालेरू नदी ओलांडून पुलावर विरुद्ध दिशेने येणारी लॉरी टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बस पुलाच्या रेलिंगला धडकून 25 फूट खाली नाल्यात पडली. तसेच आतापर्यंत पाच महिला प्रवाशांसह आठ मृतदेह बाहेर काढले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT