Crime News
Crime News Sakal
देश

Crime News: मोबाईल फोन दुरुस्तीसाठी 500 रुपये देण्यास नकार दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या

राहुल शेळके

Andhra Pradesh Crime News: आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील तिरुपती परिसरात एका अल्पवयीन मुलाने 500 रुपयांसाठी रागाच्या भरात वडिलांची हत्या केली आहे. ही घटना शनिवारी 3 जून रोजी रात्री उशिरा चित्तूर जिल्ह्यातील चिंता कुप्पम गावात घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच रामकुप्पम पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाई सुरू केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

यासोबतच कुप्पम ग्रामीणचे सीआय रियाज अहमद यांनी सांगितले की, गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे.

मुलगा मानसिक आजाराने त्रस्त होता:

फोन दुरुस्त करण्यावरून दोघांमध्ये भांडण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 17 वर्षीय मुलाने त्याचे वडील सुब्रमण्यम यांच्याकडे मोबाईल फोन दुरुस्त करण्यासाठी 500 रुपये मागितले होते. जे सुब्रमण्यम यांनी देण्यास नकार दिला.

यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात वडिलांनी मुलाला काठीने मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात काठीने वार केले.

त्यामुळे सुब्रमण्यम यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मुलाला मानसिक आजार असूनही हा मुलगा रोजंदारीवर काम करायचा आणि वडिलांसोबत पैसे कमवायचा.

याआधीही यूपीमधून अशीच एक घटना समोर आली होती. राज्यातील गोरखपूरमध्ये एका व्यक्तीने वडिलांची हत्या केली होती.

आरोपीने वडिलांकडे मोटारसायकलच्या कर्जाच्या हप्त्यासाठी पैसे मागितले होते, ते देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे आरोपीने वडिलांचा खून केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT