देश

गुगलने बदलली दहा वर्षाची परंपरा; 'अँड्रॉईड क्यू'चे नाव बदलणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गुगलने दहा वर्षापासून नावाच्या बाबतीत चालत आलेल्या परंपरेला शह दिला असून, अँड्रॉइड सिरीजची नावे बदलण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. 'अँड्रॉइड क्यू'चे नाव बदलून आता अँड्रॉइड 10 करण्यात येणार आहे.

अँड्रॉइड 10चा नवीन लोगोदेखील लाँच करण्यात येणार असून वरच्या भागामध्ये अँड्रॉइडचा रोबोट बसलेला दाखवण्यात येणार आहे. तसेच त्याच्या रंगात बदल केला असून हिरव्या रंगाऐवजी काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. ज्या लोकांना डोळ्याच्या समस्या असतील त्यांच्या साठी काळ्या रंगाचा उपयोग होईल असे यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष समीर सामंत यावेळी म्हणाले कि, आम्ही पहिल्यांदाच अँड्रॉइडच्या नावात बदल करत आहोत याआधी आम्ही खाद्य पदार्थाची नावे ठेवायचो. येणाऱ्या आठवड्यामध्ये अँड्रॉइड 10चा अंतिम लोगो रिलीज करण्यात येईल. नावामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण जगामधील प्रत्येक ग्राहकाला अँड्रॉइडचे नाव समजावे, नावे स्पष्ट आणि संबंधीत असावीत त्यामुळे इथून पुढे अंक स्वरूपात अँड्रॉइडची नावे असतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. अँड्रॉइड 10 आणि पुढील वर्षी अँड्रॉइड 11 अशी सिरीज यापुढे सुरु राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT