Supreme Court Sakal
देश

अंगणवाडी सेविकांना मिळणार ग्रॅच्युइटी; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

देशभरात तळागाळात काम करणाऱ्या 25 लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका/मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली: देशभरात तळागाळात काम करणाऱ्या 25 लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका/मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. विविध कल्याणकारी योजनांचा कणा आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण सेवा देत असतानाही त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात असल्याने त्यांची समस्या गंभीर आहे अस म्हणत त्या ग्रॅच्युइटी देण्यास पात्र आहेत अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे देशभरातील अंगणवाडी सेविकांना याचा फायदा होणार आहे.

२०१७ मध्ये या मागणीची याचिका गुजरात हायकोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी वकील प्योली मार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वौच्च न्यायालयाने पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972 अंगणवाडी सेविकांना लागू होईल असं सांगत त्याच्या बदल्यात पूर्णवेळ काम न करणाऱ्या मदतनीसांना हा कायदा लागू होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

या मुद्द्यावर दोन्ही न्यायमूर्तींचे एकमत होते पण त्यांनी स्वतंत्र निकाल दिला असून सामाजिक सुरक्षा कायद्यांचा नेहमी उदारमताने अर्थ लावला जावा असे न्यायमूर्ती रस्तोगी म्हणाले.

"Anganwadi workers (AWWs) आणि helpers(AWHs) यांना सर्व व्यापक कर्तव्ये सोपवण्यात आली आहेत, ज्यात लाभार्थ्यांची ओळख, पौष्टिक अन्न शिजविणे, मुले, गरोदर महिला तसेच स्तनदा माता यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या तरतुदींची अंमलबजावणी त्यांना सोपवण्यात आली आहे. त्यामुळे AWW आणि AWH ला दिलेली नोकरी ही अर्धवेळ नोकरी आहे, त्यामुळे त्यांना ग्रॅच्युइटी देता येणार नाही.” असं न्यायमूर्ती ओका म्हणाले.

"AWWs आणि AWHs या पगारापासून वंचित आहेत पण राज्यातील कर्मचार्‍यांना इतर फायदे उपलब्ध आहेत," असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

दरम्यान अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून मतभिन्नता निर्माण झाली असून गुजरात, दिल्ली आणि मुंबईच्या उच्च न्यायालयांनी परस्परविरोधी निवाडे दिले आहेत पण त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT