jaggi vasudev Team eSakal
देश

''प्राणीप्रेम असेल तर मासांहार कमी करा, पण फटाके फोडू द्या''

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मुलांना फटाके फोडण्यापासून रोखू नये, असा सल्ला देणारे आध्यात्मिक गुरू जग्गी वासूदेव (Jaggi Vasudeo) आपल्या मतावर ठाम असून त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मुलांच्या आनंदासाठी फटाक्यांवरील बंदी (Firecracekrs ban) उठविण्यात यावी. तुम्हाला प्राणी आणि प्रदूषणाबाबत इतकंच प्रेम असेल तर मांसाहार कमी करा, असं मत त्यांनी मांडलं आहे.

''आपण दररोज २०० दशलक्ष प्राण्यांची कत्तलखान्यात कत्तल करत असतो. फक्त दिवाळीच्या वेळी आपले प्राणी आणि पक्ष्यांबद्दल प्रेम जागृत होते. मासांहार करणे कमी केले, तर आपण दररोज १०० दशलक्ष प्राणी वाचवून शकतो. तुम्हाला जर प्राण्यांबद्दल प्रेम असेल तुम्ही हे करायला पाहिजे. तुम्ही खात असलेले कबाब, बीफ हे प्राणी आहेत. त्यांना मारून तुम्हाला हे पदार्थ खायला मिळतात. त्यासाठी कधीतरी कत्तलखान्याला भेट द्या. त्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टींची जाणीव होईल'', असं गुरू जग्गी वासूदेव म्हणाले.

यापूर्वी जग्गी वासूदेव यांनी मुलांना फटाके वाजविण्याचा सल्ला दिला होता. ''मुलांना फटाके फोडण्यापासून रोखू नका. मी बर्‍याच वर्षात फटाका पेटवला नाही. पण लहानपणी मला त्याचा किती आनंद मिळत होता ते आठवते." ज्या लोकांना वायू प्रदूषणाची चिंता आहे त्यांनी रोज आपल्या कामाच्या ठिकाणी चालत जावे, मुलांना मजा करता यावी म्हणून पुढील तीन दिवस गाडी चालवू नये. मुलांना फटाके फोडण्याची मजा घेऊ द्या, असं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Aaghadi: इंडिया आघाडीचं ठरलं! भाजपविरोधात 'हा' प्लॅन रेडी; उद्धव ठाकरेंचा मात्र वेगळाच सूर, भर बैठकीत सुनावलं...

Donald Trump: ''तात्काळ हल्ले थांबवा, नाहीतर...'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराण-इस्रायलला इशारा; पुढच्या दोन दिवसात सगळं थांबणार?

Ujjwala Scheme: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका! केंद्र सरकारने सबसिडीच्या सिलिंडरची संख्या घटवली; आता किती मिळणार?

Rave Party Case : रेव्ह पार्टी प्रकरण! तुळापुरातील फार्महाऊस सील; शिवराज्याभिषेक दिनीच पार्टी झाल्याने ग्रामस्थांचा संताप

IND A Tri-Series: वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, भारतीय अ संघ श्रीलंकेत खेळणार वनडे तिरंगी मालिका! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामने?

SCROLL FOR NEXT