देश

काश्मीर : शरण येण्यास सांगूनही ओसामा बाहेर नाही आला अन्...

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील रामबन येथे हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा याला विशेष पोलिस अधिक्षक अनिता शर्मा यांनी शरण येण्याची संधी देऊनही तो न आल्याने त्याला ठार करण्यात आले.

रामबन येथे झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून ओसामा, झाहिद आणि फारुख अशी त्यांची नावे आहेत. यातील ओसामा हा भाजप नेत्याच्या हत्याप्रकरणी सुरक्षा दलांना हवा होता. ओसामा हा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर होता, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अनित शर्मा या त्याला ध्ननीक्षेपकावरून सतत शरण येण्यास सांगत होत्या. पण, तो शरण न आल्याने त्याने गोळीबार केला. त्यामुळे त्याला चकमकीत ठार करण्यात आले.  

रामबन जिल्ह्यात सामान्य नागरिकाला ओलिस ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला असून, या कारवाईत लष्कराचा एक जवान हुतात्मा झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्याने दिली. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या बटोत भागात लष्कराकडून शोधमोहीम राबविण्यात आली. नऊ तासांहून अधिक काळ सुरू असलेली शोधमोहीम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT