Gandhi Peace Prize
Gandhi Peace Prize  esakal
देश

Gandhi Peace Prize : मोदींनी दिलेला गांधी शांति पुरस्कार स्विकारला पण १ कोटींची रक्कम केली परत, कारण...

साक्षी राऊत

Gandhi Peace Prize : जगप्रसिद्ध गीता प्रेसला २०२१ चा गांधी शांति पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेतील जूरीने दिलेल्या निर्णयानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयद्वारे ही घोषणा करण्यात आली.

मात्र गीता प्रेस बोर्डने या पुरस्काराबाबत घेतलेला निर्णय अनेकांना आश्चर्यात पाडणारा आहे. गीता प्रेस बोर्डने हा सन्मान स्विकारण्याचा मात्र त्यासोबत मिळणारी तब्बल १ कोटींची रक्कम न स्विकारण्याचा निर्णय घेतलाय. याआधी गीता प्रेस बोर्डाने एकाही पुरस्काराचा स्वीकार केलेला नाही.

गीता प्रेस ही शंभर वर्षांपासून सनातन संस्कृतीचे समर्थक आहेत. त्यांची ख्याती सनातन संस्कृती आणि धार्मिक ग्रंथांच्या रूपातही आहे. गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार दिल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

व्यवस्थापनाशी संबंधित लोकांनी हा पुरस्कार सनातन संस्कृतीचा सन्मान असल्याचे वर्णन केले आहे, परंतु त्यांच्या परंपरेनुसार प्रेस कोणताही सन्मान स्वीकारत नाही, असेही म्हटले आहे. यंदाची परंपरा मोडून सन्मान स्वीकारला जाईल, असे मंडळाच्या बैठकीत ठरले असले, तरी त्यासोबत मिळालेली एक कोटी रुपयांची रक्कम घेतली जाणार नाही.

गांधी शांतता पुरस्कारामध्ये प्रशस्तीपत्र, एक फ्रेम आणि उत्कृष्ट पारंपारिक हस्तकला, ​​हातमाग कलाकृतीसह एक कोटी रुपयांची रक्कम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गीता प्रेस मंडळाच्या बैठकीत रक्कमेव्यतिरिक्त प्रशस्तीपत्र, फ्रेम आणि हस्तकला, ​​हातमाग कलाकृती आदी स्वीकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Bhagavad Gita)

व्यवस्थापकांचे काय म्हणणे आहे?

गीता प्रेसचे व्यवस्थापक लालमणी तिवारी यांनी सांगितले की, आतापर्यंत कोणताही सन्मान न स्वीकारण्याची आमची परंपरा आहे. सन्मान स्वीकारू पण येणारा पैसा स्वीकारणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. गीता प्रेसच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा पुरस्कार मिळाल्याने आनंद होत असल्याचे ते म्हणाले. (Narendra Modi)

या सन्मानाबद्दल त्यांनी गीता प्रेसच्या वतीने भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. तसेच हा सन्मान मिळणे ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. असेच काम पुढेही आम्ही सातत्याने करत राहू असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT