Petrol Price:  esakal
देश

Petrol Price: लोकसभेच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त, कोणत्या शहरात कसे असतील दर?

Petrol Price: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Sandip Kapde

Petrol Price:

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी केंद्राने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात केली. 15 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू होतील, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले.

लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या किमतींमध्ये नुकत्याच झालेल्या कपातीमुळे, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

X वरील एका पोस्टमध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, “पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे नेहमीच ध्येय आहे. ” (Latest Marathi News)

कोणत्या शहरात कसे असतील दर -

दिल्लीत पेट्रोलचे दर 96.72 रुपयांवरून 94.72 रुपयांवर आले आहेत तर मुंबईत पेट्रोलचे दर 106.31 रुपयांवरून 104.21 रुपयांवर आले आहेत. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 106.3 रुपयांवरून 103.94 रुपयांपर्यंत कमी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT