Rahata Lead covid vaccination  sakal
देश

पुण्यात बनवली जातेय आणखी एक देशी लस; आरोग्य मंत्रालयाची माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना परिस्थितीबाबत पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि कर्नाटका या चार राज्यांमध्ये 50 हजारांहून अधिक ऍक्टीव्ह केसेस सध्या आहेत. तर 11 राज्यांमध्ये 10 हजार ते 50 हजारच्या दरम्यान रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. तसेच पुण्यात आता आणखी एक लस विकसित केली जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. (Corona Vaccine in Pune)

जगाला या कोरोना विषाणूबद्दल सर्वकाही माहिती नाहीये. त्यामुळे त्याचं निरीक्षण आणि त्याबाबतची दक्षता घेणे सुरुच राहील, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, एकूणात कोरोनाची परिस्थिती ही आशादायक आहे. मात्र, काही राज्ये जसं की, केरळ, मिझोराम, हिमाचल प्रदेश यांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आपण आपली शस्त्रे खाली टाकू शकत नाही. 24 जानेवारी रोजी दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट हा 20.75 टक्के होता जो आता 4.44 टक्क्यांवर आला आहे. कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असल्याचंच यातून दिसून येतंय, असंही त्यांनी म्हटलंय.

भारतातील पहिली देशी मेसेंजर RNA (mRNA) कोरोना लस पुण्यामधील जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सद्वारे विकसित केली जात आहे. सध्या ती अंतिम टप्प्यातील चाचण्यांमधून जात असून लवकरच आपण वापरु शकू, अशी आशा आहे.

आपण या विषाणूमुळे खूप काही शिकू शकलो आहे. मात्र, या विषाणूबाबत सगळंच काही जगाला माहिती नाहीये. या विषाणूसोबत लढण्यासाठी जगाने एकसंधच रहायला हवं तसेच आपल्या हाती असलेल्या संसाधनांचा वापर आपण करतच राहिला पाहिजे, असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT