ISRO
ISRO 
देश

ISRO PSLV Module 3 : आणखी एक मैलाचा दगड! इस्रोचं रॉकेट अंतराळात कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल

सकाळ ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. इस्रोचं रॉकेट PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्युल ३नं अंतळारात कुठलाही कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आहे. चार दिवसांपूर्वी अर्थात २१ मार्च २०२४ या रॉकेटनं ही कामगिरी केली. इस्रोनं ट्विट करत या मोहिमेची माहिती दिली. (another milestone was achieved by isro when pslv orbital experimental module 3 re entry into the earth atmosphere)

इस्रोनं सोमवारी सांगितलं की, त्यांच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनानं (PSLV) शून्य ऑर्बिटल डेब्रिस मोहीम पूर्ण केली आहे. याला 'आणखी एक मैलाचा दगड' असं इस्रोनं म्हटलं आहे. 21 मार्च रोजी ही मोहिम फत्ते झाली असून यामध्ये PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल-3 नं (POEM-3) पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करून ते उद्ध्वस्त झालं. पण विशेष म्हणजे यामध्ये PSLV-C58/XPoSat या मोहिमेनं अंतराळ कक्षेत शून्य कचरा सोडला" असं इस्रोनं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

इस्रोच्या म्हणण्यानुसार, सर्व उपग्रहांना त्यांच्या इच्छित कक्षेत पोहोचवण्याचं प्राथमिक अभियान पूर्ण केल्यानंतर, PSLV च्या टर्मिनल स्टेजचं 3-अक्ष स्थिर प्लॅटफॉर्म, POEM-3 मध्ये रूपांतर झालं. स्टेजला 650 किमी ते 350 किमी पर्यंत डिऑर्बिट केलं गेलं. ज्यामुळं त्याचा लवकर पुन्हा प्रवेश करणं सुलभ झालं. या पेलोड्सची उद्दिष्टे एका महिन्यात पूर्ण झाली. (Marathi Tajya Batmya)

ISRO नं या मोहिमेवर भाष्य करताना म्हटलं की, इस्रो एक जबाबदार अंतराळ संस्था असल्यानं, प्रगत डेब्रिज ट्रॅकिंग सिस्टीम, स्पेस-ऑब्जेक्ट डीऑर्बिटिंग तंत्रज्ञान आणि जबाबदार उपग्रह उपयोजन पद्धतींच्या विकास आणि अंमलबजावणीद्वारे हा धोका कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे, अशा प्रकारे वर्तमान आणि भविष्यातील अंतराळ प्रयत्नांसाठी कक्षीय वातावरणाचं रक्षण करते, असंही त्यात म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT