Anti-viral drug Molnupiravir 
देश

Molnupiravir गोळीला मंजूरी; कोरोनाविरोधात किती प्रभावी? वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना महासाथीचे (Coronavirus) थैमान गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत या महासाथीमध्ये जगभरातील ५० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अजूनही कोरोनाचा कहर संपुष्टात आलेला नाहीये. आतापर्यंत तरी कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये फक्त लसीच उपलब्ध होत्या. शंभर टक्के परिणामकारक ठरेल, असं कोणतंही औषध कोरोनावर उपलब्ध नव्हतं. मात्र, आता कोरोनावरील एका औषधाला भारतामध्ये मंजूरी मिळाली आहे. मोलनुपिरावीर असं या औषधाचं नाव आहे. अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीर (Anti-viral drug Molnupiravir) आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाऊ शकतात, अशी माहिती आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज मंगळवारी ट्विटरद्वारे दिली आहे.

Merck & Co कंपनीचा असा दावा आहे की, हे औषध कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये प्रभावी ठरु शकतं. मर्क या अमेरिकन कंपनीने या औषधाच्या निर्मितीसाठी अमेरिकेच्या Ridgeback Biotherapeutics कंपनीसोबत करार केला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही गोळी प्रभावी असून तिच्यामुळे रुग्णाला दवाखान्यात भरती करण्यापासून अथवा त्याच्या मृत्यूची संभावना कमी होते.

ट्रायलमध्ये ७७५ लोकांचा समावेश

कंपनीने म्हटलंय की, ट्रायलमध्ये ७७५ लोकांचा समावेश करण्यात आला होता. प्राथमिक आकडेवारीनुसार, ज्या रुग्णांनी कोरोनाचे संक्रमण झाल्याच्या पाच दिवसांच्या आत हे औषध घेतलं आहे त्यांच्यावर दवाखान्यात भरती व्हायची अथवा मृत्यू व्हायचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो. सुरुवातीला या औषधानं क्लिनिकल ट्रायलमध्ये हायरिस्क रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आणि मृत्यूची शक्यता ३० टक्क्यानं कमी असल्याचं दिसून आलं होतं.

MHRAच्या माहितीनुसार, या अँटीव्हायरल औषधाला मोलनुपिरावीर म्हणतात. विषाणूची प्रतिकृती बनवण्याची क्षमता कमी करण्याच कार्य हे औषध करते, ज्यामुळे आजाराच्या प्रसाराचा वेग कमी होतो. आमच्या चाचण्यांमध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, "हे औषध गंभीर आजार होण्याचा धोका असलेल्या सौम्य ते मध्यम कोविडबाधित लोकांना रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे"

दरम्यान, क्लिनिकल ट्रायलमधील डेटाच्या आधारे, संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हे औषध घेतल्यास जास्त प्रभावी ठरते. तसेच MHRA नं शिफारस केलीए की कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यापासून हे औषध पाच दिवसांच्या आत वापरावं. लठ्ठपणा, म्हातारपण, मधुमेह आणि हृदयरोग यासह गंभीर आजार असलेल्या लोकांना वापरण्यासाठी या औषधाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : पाकिस्तानात पुन्हा पुलवामा सारखा आत्मघाती हल्ला; बलुचिस्तानमध्ये ५ सुरक्षा जवानांसह ८ जणांचा मृत्यू

'VFX कौतुक पुरे! अभिनय कधी करणार?' करण जोहरचा बॉलिवूड कलाकारांना टोला; 'रामायण'च्या चर्चेदरम्यान वक्तव्य व्हायरल

Gokak Waterfall Flowing : गोकाक धबधब्याला मिळाली नवसंजीवनी! हिडकल जलाशयातून पाणी सोडताच पुन्हा प्रवाहित झाला धबधबा, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी साजरा केला बालदिन; केक वाटून मुलांच्या चेहऱ्यावर आणले हास्य

कोस्टल रोडच्या बोगद्यात मध्यरात्री अपघाताचा थरार! सहा वाहनांची भीषण धडक, अनेक गाड्यांचे नुकसान

SCROLL FOR NEXT