corona_25_14.gif
corona_25_14.gif 
देश

अँटीबॉडीजमुळे कोरोनापासून संरक्षण नाही; संशोधकांच्या दाव्यामुळे चिंता वाढली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- मानवी शरीरातील अँटीबॉडीज अथवा प्रतिपिंडांमुळे व्यक्तीचे नेहमीच कोरोना अथवा सार्सच्या विषाणूंपासून संरक्षण होत नाही. या अँटीबॉडीज मानवी शरीरामध्ये कितीकाळ टिकतात किंवा टिकाव धरणारे त्यांचे अन्य उपप्रकार कोणते आहेत याचा अंदाज वर्तविणे कठीण असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने संशोधकांची चिंताही वाढली आहे. काही दिवसांपूर्वी शरीरातील अँटीबॉडीजमुळे मानवी शरीरात काही सकारात्मक परिणाम घडून येत असल्याचे आढळून आले होते. संशोधक आता या परिणामांचा गांभीर्याने अभ्यास करत आहेत.

अँटीबॉडीजच्या प्रभावाबाबत संशोधकांमध्ये मतैक्य नाही, याबाबत केवळ वेगवेगळे अंदाजच वर्तविण्यात येतात, एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये या अँटीबॉडीज आढळून आल्या तर त्यावरून एक निष्कर्ष मात्र निश्‍चितपणे काढता येतो तो म्हणजे त्या व्यक्तीला या आधी कोरोनाची बाधा झाली होती. संशोधनातून आता हाती आलेले पुरावे आपल्याला नेमके कोणत्या दिशेला घेऊन जातात? हे काळजीपूर्वक पाहावे लागेल असे विषाणूतज्ज्ञ सत्यजित रथ यांनी सांगितले.

जगाने यापेक्षाही भयंकर महामारीसाठी तयार रहावं; WHO प्रमुखांचा इशारा

सिरो सर्व्हेतून प्रभाव उघड नाही

एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील अँटीबॉडीज असतील तर त्या शरीरामध्ये विषाणूंचा कशाप्रकारे प्रसार होतो आहे? हे स्पष्टपणे सांगू शकत नाही असे दिल्लीतील राष्ट्रीय विषाणू संस्थेतील संशोधकांचे म्हणणे आहे. एनएबीएस या अँटीबॉडीज कोरोना विषाणूंचा प्रसार रोखू शकतात. शरीराच्या विविध भागांमध्ये या अँटिबॉडीजची निर्मिती होत असते असे पुण्यातील आयसर या संस्थेतील संशोधक विनिता बाल यांनी सांगितले. देशाच्या विविध भागांमध्ये याआधी सिरो सर्व्हे करण्यात आले होते पण त्यातून देखील अँटीबॉडीजचा प्रभाव उघड झालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT