Rahul Gandhi 
देश

मोदी, शहांना विरोध केल्यास तुम्ही शहरी नक्षलवादी : राहुल गांधी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोध करणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरविले जाते, अशी जोरदार टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी केली आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी राज्यामध्ये जोर धरत असतानाच केंद्र सरकारने अचानक तडकाफडकी निर्णय घेत हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग केले. हे करण्याआधी महाराष्ट्र सरकारला विश्‍वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्राच्या निर्णयावर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर संशय घेतला असून, सत्य बाहेर येईल या भीतीमुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

आता राहुल गांधी यांनीही ट्विट करत या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्याने टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, की मॉश (मोदी-शहा) यांना विरोध करणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरविले जाते. कोरेगाव-भीमा हे संघर्षाचे प्रतीक असून, सरकारच्या तालावर नाचणारी एनआयए ते मिटवू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमा व्रताच्या कथेचं पुस्तक नाहीये? मग व्रत परिपूर्ण करण्यासाठी वाचा सत्यवान-सावित्रीची कथा ऑनलाइन

IND vs IRE, T20I: 'अन् तिथेच आम्ही कमी पडलो', कर्णधार श्रेयस अय्यरने व्हाईटवॉशनंतर दिली कबुली

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

SCROLL FOR NEXT