Mahua Mitra sakal
देश

खंडणीखोरांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन

‘तृणमूल’च्या खासदार महुआ मित्रा यांची मोहीम

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : नागरिकांना संपर्क साधून तक्रार करण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘दीदी के बोल’ही जनसंपर्क मोहीम सुरू केलेली आहे. त्याच धर्तीवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मित्रा यांनी खंडणीखोराविरोधात लेखी तक्रारी करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. प्रभावी नेते अथवा ‘तृणमूल’शी संबंधित कोणी असले तरी त्याविरोधात तक्रार करता येणार आहे.भ्रष्टाचारी नेत्यांविरोधात कारवाई करण्याचे स्वातंत्र्य ममता बॅनर्जी यांनी दिले असल्याकडे मित्रा यांनी लक्ष वेधले आहे.

फेसबुकच्या माध्यमातून त्या म्हणाल्या की, ‘‘माझ्याकडे आलेल्या तक्रारी चौकशीसाठी व कारवाईसाठी संबंधित पोलिस स्थानकांकडे पाठविण्यात येणार आहेत. रोजगार देण्याच्या आश्‍वासन देऊन भ्रष्टाचार केल्याचा आणि खंडणी मागितल्याचा आरोप ‘तृणमूल’च्या एका गटाने त्यांच्याच नेत्यांवर केल्यानंतर पक्षाकडून खंडणीबहाद्दरांवर कारवाईची मोहीम सुरु केली आहे. ‘तृणमूल’चे तेहत्ता येथील आमदार तपस साहा यांच्याविरोधात पक्षातीलच नेत्यांनी रोजगाराच्या आमिषाने पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तेहत्ता मतदारसंघाचा समावेश महुआ मित्रा यांच्या लोकसभा मतदारसंघात होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

Diwali Railway Tickets : दिवाळीच्या रेल्वे तिकिटांना आतापासूनच प्रतीक्षा ; आरक्षण सुरू होताच पाच मिनिटांत ‘रिग्रेट’; लांब पल्ल्याच्या गाड्यांना मागणी

Pune Bridge Repairs : पुण्यातील २१ पुलांची दुरुस्ती आयुर्मान वाढण्यास मदत; दरवर्षी होणार नियमित तपासणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT