UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

PhonePe and Google Pay Could See Higher Revenue : १५ ऑक्टोबरपासून ₹२,००० पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर ०.४ टक्के MDR शुल्क लागू होणार असल्याने PhonePe आणि Google Payच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे.
UPI Payments

UPI MDR Charges

esakal

Updated on

UPI Payments: 15 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने UPI पेमेंटवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर UPI व्यवहारांवरील शुल्काचा मुद्दा चर्चेत आला असून, काही व्यापारी संघटनांकडून या निर्णयाला विरोधही करण्यात येत आहे. दरम्यान, नव्या शुल्कामुळे पेमेंट कंपन्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.

मार्च 2028 पर्यंत वर्षाला 1.1 अब्ज डॉलरची अतिरिक्त कमाई?

ब्रोकरेज फर्म Bernsteinच्या अंदाजानुसार, नव्या शुल्कामुळे मार्च 2028 पर्यंत पेमेंट अॅप्सना दरवर्षी सुमारे 1.1 अब्ज डॉलरची अतिरिक्त कमाई होऊ शकते. सध्याच्या UPI बाजारातील कंपन्यांच्या हिस्स्यानुसार या अतिरिक्त उत्पन्नातील मोठा भाग PhonePe आणि Google Payला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्यांना मिळून सुमारे 900 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 7,500 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते.

UPI Payments
Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

PhonePe आणि Google Payचा UPI व्यवहारांमध्ये मोठा वाटा

UPIच्या बाजारपेठेत Walmartच्या पाठिंब्याची PhonePe आणि Google Pay या दोन्ही कंपन्यांचा मोठा वाटा आहे. गेल्या महिन्यातील आकडेवारीनुसार, या दोन कंपन्यांनी मिळून UPIच्या एकूण व्यवहार मूल्यापैकी जवळपास 80 टक्के व्यवहार हाताळले आहेत. त्यामुळे नव्या MDR शुल्काचा आर्थिक फायदा या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

या अतिरिक्त उत्पन्नाचा वापर कंपन्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, नव्या ग्राहकांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी तसेच छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात सेवा विस्तारण्यासाठी करू शकतात.

15 ऑक्टोबरपासून 0.4 टक्के शुल्क

सरकारच्या निर्णयानुसार, भारतात 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर 0.4 टक्के मर्चंट फी आकारली जाणार आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे जवळपास सहा वर्षांनंतर UPI व्यवहारांवर पुन्हा मर्चंट फी लागू होणार आहे. आतापर्यंत UPIद्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारताना दुकानदारांकडून अशा प्रकारचे शुल्क आकारले जात नव्हते.

UPI Payments
Diwali Railway Tickets : दिवाळीच्या रेल्वे तिकिटांना आतापासूनच प्रतीक्षा ; आरक्षण सुरू होताच पाच मिनिटांत ‘रिग्रेट’; लांब पल्ल्याच्या गाड्यांना मागणी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com