Loksabha Election  sakal
देश

Loksabha Election : वाराणसीत ‘एनडीए’च्या नेत्यांचे शक्तिप्रदर्शन ; पंतप्रधान मोदींनी भरला अर्ज,आजी-माजी मुख्यमंत्र्यांची हजेरी

बाबा विश्‍वनाथ यांचे शहर आणि भारताची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसी येथे मंगळवारी (ता.१४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शरत प्रधान

वाराणसी : बाबा विश्‍वनाथ यांचे शहर आणि भारताची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसी येथे मंगळवारी (ता.१४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. यात विविध पक्षांचे प्रमुख आणि विविध राज्यांच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहात शक्तिप्रदर्शन केले.

मोदी यांनी सकाळी ११वाजून ४० मिनिटांनी येथील जिल्हा दंडाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधानांच्या उमेदवारी अर्जासाठी आवश्‍यक असणाऱ्या प्रस्तावकांमध्ये हिंदू समाजातील प्रत्येक समुदायाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे. मात्र त्यांच्या प्रस्तावकांमध्ये एकाही मुस्लिम व्यक्तीचा समावेश नाही.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनासाठी ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ (एनडीए)मधील अनेक प्रमुख नेते आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यात प्रमुख्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होत. त्याच प्रमाणे जितन प्रसाद मांझी, चिराग पासवान यांसह ईशान्य भारतातील नेतेही उपस्थित होते. तसेच भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथसिंहही उपस्थित होते.

नितीशकुमार अनुपस्थित

पाटण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये सहभागी झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची देखरेख आहे. त्यामुळेच वाराणसी येथे मोदी हे उमेदवारी अर्ज दाखल करताना नितीशकुमार उपस्थित राहू शकले नाही. त्यांचे आजचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या अंत्यदर्शनालाही ते जाऊ शकले नाहीत.

भगवा आणि पांढरा कुर्ता

एक दिवस आधी झालेल्या रोड शोमध्ये आणि त्याआधी बाबा विश्‍वनाथांचे दर्शन घेताना भगव्या रंगाचा कुर्ता परिधान करत हिंदुत्ववादी नेतृत्वाची प्रतिमा अधोरेखित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निवडणूक अर्ज दाखल करताना मात्र पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाचे जाकीट परिधान केले. ‘सब का साथ सब का विकास’ ही पंतप्रधान मोदी यांची घोषणाच सरकारचे धोरण असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला असल्याचे मानले जात आहे.

पंतप्रधानांची भावनिक प्रतिक्रिया

सलग दोन वेळा वाराणसी मतदारसंघातून निवडून आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी मागील निवडणुकांदरम्यान ‘‘माँ गंगाने मुझे बुलाया है’’ अशी भावनिक प्रतिक्रिया दिली होती. यावेळी पंतप्रधानांनी गंगेच्या किनाऱ्यावर एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, ‘माँ गंगाने मुझे गोद लिया है.’ गंगेने मला पदरात घेतल्याची भावना व्यक्त करत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा वाराणसीतील मतदारांना भावनिक साद घातल्याचे मानले जात आहे.

प्रस्तावकांच्या निमित्ताने ‘सोशल इंजिनिअरिंग’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी अर्जाच्या प्रस्तावकांमध्ये एक ब्राह्मण, दोन ओबीसी आणि दलित समाजातील एका व्यक्तीचा समावेश करत ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांच्या चार प्रस्तावकांमध्ये पहिले प्रस्तावक म्हणून पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड आहेत. अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा विधी त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता. दुसरे प्रस्तावक वैजनाथ पटेल असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिवपुरी भागातील स्वयंसेवक असून ते ओबीसी समाजाचे आहेत. तिसरे प्रस्ताव लालचंद कुशवाह हेसुद्धा ओबीसी समाजाचे असून ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. चौथे प्रस्तावक संजय सोनकर हे दलित असून ते उत्तर काशी जिल्हा भाजपचे सरचिटणीस आहेत.

मोदींचे देवदर्शन आणि पूजा-अर्चा

  • मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या दरम्यान दशाश्‍वमेध घाट येथे गंगा आरती

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी काशीचे कोतवाल काल भैरव यांचे घेतले दर्शन

  • पावणेबाराच्या सुमारास जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात उमेदवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रस्तावकांसह दाखल होत उमेदवारी अर्ज दाखल

पंतप्रधानांना जिरेटोप भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप भेट दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसेच एनडीएचे नेते उपस्थित होते. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT