Air India - Vistara Merger esakal
देश

Air India-Vistara Merger: एअर इंडिया अन् विस्तारा यांच्यातील प्रस्तावित विलीनीकरणाला मान्यता! काय आहेत अटी?

Air India - Vistara Merger: एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणास मान्यता देण्यात आली आहे. सिंगापूरच्या कॉम्पिटिशन वॉचडॉगने याला मान्यता दिली आहे.

Sandip Kapde

Air India - Vistara Merger Update: एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणास मान्यता देण्यात आली आहे. सिंगापूरच्या कॉम्पिटिशन वॉचडॉगने याला मान्यता दिली आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया आणि टाटा-सिंगापूर एअरलाइन्सच्या संयुक्त उपक्रम एअरलाइन विस्ताराच्या विलीनीकरणास अटींसह मान्यता देत असल्याचे सिंगापूर कॉम्पिटिशन वॉचडॉगने स्पष्ट केले आहे.

सिंगापूरच्या स्पर्धा नियामक CCCS ने मंगळवारी सांगितले की त्यांनी एअर इंडिया आणि विस्ताराच्या प्रस्तावित विलीनीकरणाला सशर्त मान्यता दिली आहे. सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 25.1 टक्के भागभांडवल विकत घेणाऱ्या करारांतर्गत विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर करण्यात होते. विस्तारा ही सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.

सिंगापूरच्या स्पर्धा आणि ग्राहक आयोगाने (CCCS) एअर इंडिया, सिंगापूर एअरलाइन्स आणि विस्तारा यांच्याकडून स्पर्धाविरोधी चिंता दूर करण्यासाठी काही प्रस्ताव स्विकारल्यानंतर करारासाठी सशर्त मान्यता दिली आहे.

प्रस्तावामध्ये सिंगापूर-दिल्ली (SIN-DEL), सिंगापूर-मुंबई (SIN-BOM), सिंगापूर-चेन्नई (SIN-MAA) आणि सिंगापूर-तिरुचिरापल्ली (SIN-TRZ) मार्गांवर नियोजित हवाई प्रवासी वाहतूक सेवांचा समावेश आहे.

वॉचडॉगने म्हटले आहे की सिंगापूर आणि नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि तिरुचिरापल्ली यांसारख्या भारतीय शहरांदरम्यान चार मार्गांवर थेट उड्डाणे चालवणाऱ्या एअरलाइन्समध्ये त्याचा सर्वाधिक बाजार हिस्सा आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT