देश

A.R.Antulay Death Anniversary : ‘छत्रपती शिवरायांचा खरा सन्मान कोणी केला असेल तर महाराष्ट्राच्या पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्र्यांनी’

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राजकारणी सतत काहीतरी बरळत आहेत. मग ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असोत किंवा भाजप नेते मंगल प्रभात लोढा असोत. याआधीही वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य करून राज्यपालांनी जनतेचा रोष पत्कारला आहे. तर, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. जनतेतूनही त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.

एकीकडे महाराजांना राजकारणाचा मुद्दा बनवले जात आहे. पण, एकेकाळी स्वत: मुस्लिम समाजाचे असूनही महाराजांना दैवत म्हणून पुजणारे लोकप्रिय मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेली श्रद्धा कौतूकास्पद आहे. बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते. त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे महाराजांप्रती असलेले प्रेम आणि त्यातून त्यांनी घेतलेले निर्णय पाहुयात.

अब्दुल रहमान अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी झाला. रायगड जिल्ह्याच्या आंबेत हे त्यांचे मूळ गाव आहे. अंतुले ह्यांनी मुंबई विद्यापीठ व लंडन येथे शिक्षण घेऊन बॅरिस्टरची पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये १९६२ सालापासून कार्यरत असलेले अंतुले १९६२ ते १९७६ दरम्यान विधानसभेचे सदस्य होते. १९७६ ते १९८० दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर १९८० मध्ये अंतुले पुन्हा विधानसभेवर निवडून आले. व जून १९८० ते जानेवारी १९८२ दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महारांजाचा खऱ्या अर्थाने सन्मान केला. 'कुलाबा' जिल्ह्याचं नाव 'रायगड' करणं असो वा लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणण्याची घोषणा असो, बॅरिस्टर अंतुले यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ अनेक घोषणांनी, घटनांनी गाजला.

अंतुले यांचे रायगड जिल्ह्याबद्दल अपार प्रेम होते. रायगड जल्ह्याचे पूर्वीचं नाव 'कुलाबा' होते. मात्र, ही शिवरायांची भूमी आहे.  त्यामुळे त्यांचेच नाव या जिल्ह्यालाही हवे असे ठरवून अंतुले यांनी 'रायगड' असं कुलाबाचे नामांतर केले.

मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक तैलचित्र लावण्यात आले आहे. हे चित्रही  तत्कालिन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्याच काळात लावण्यात आले. मंत्रालयाच्या बाहेरून जाणाऱ्या लोकांनाही ते स्पष्ट दिसावे असा यामागिल उद्देश होता. त्यामूळे स्वतः बाहेरून फेरफटका मारून ते सर्वांना दिसते का हे तपासले होते.

भवानी तलवार परत आणण्यासाठीही प्रयत्न केले

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लडमध्ये आहे. ही तलवार परत यावी असे सर्वांनाच वाटते. मात्र त्यासाठी प्रयत्न खूप कमी होताना दिसतात. पण, मुख्यमंत्री अंतूले यांनी तलवार परत आणण्यासाठी त्यांनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्याशी बैठकही ठरवली होती. पण, या चर्चेच्या आधीच त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यामूळे ते काम अपूर्णच राहिले.

१९८२मध्ये त्यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम देणे भाग पडले. १९८९ पर्यंत आमदार राहिल्यानंतर अंतुले ९ व्या लोकसभेवर निवडून गेले व १९९८ पर्यंत खासदारपदावर राहिले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले अंतुले मनमोहन सिंग केंद्र सरकारमध्ये २००६ ते २००९ दरम्यान पहिले केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री होते.

२००४ साली १४ व्या लोकसभेवर निवडून आल्यानंतर २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना रायगड मतदारसंघामधून अनंत गीते ह्यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. त्यानंतरही ते राजकारणात सक्रीय होते. पण, मुत्रपिंडाच्या आजाराने त्यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी मुंबईत  निधन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT