jp nadda sonia gandhi File Photo
देश

तुम्ही कोरोना लढ्याला कमजोर करताय?; नड्डांचा सोनिया गांधींवर पलटवार

जेपी नड्डांनी विचारला सोनिया गांधींना पत्र लिहून सवाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर (corona outbreak) अद्यापही सुरुच आहे. मात्र, कोरोनावरुन होणारं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाहीए. सोमवारी सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकारीणीच्या (CWC) बैठकीवरुन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी सोनियांना एक पत्र लिहिलं. या पत्रातून तुम्ही कोरोनाच्या लढ्याला कमजोर करु पाहताय का? असा सवाल करत पलटवार केला. (Are you trying to weaken fight against Covid 19 JP Nadda writes Sonia Gandhi)

जेपी नड्डा यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात आपण काँग्रेसच्या वागणुकीमुळे दुःखी झाल्याचं म्हटलं आहे. त्यांनी पत्रात लिहिलं की, "आपल्याच पक्षाचे काही लोक तळागळातील लोकांची मदत करण्याचं कौतुकास्पद काम करत आहेत. पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नकारात्मकेमुळं या लोकांची मेहनत वाया जात आहे"

भाजपानं मोफत लसीची केली घोषणा

एकीकडे भारत कोरोनाच्या खतरनाक लाटेशी झुंजत आहे. त्याचवेळी काँग्रेसचे टॉपचे नेते लोकांना चुकीच्या सूचना देणं, उगाचच भीती निर्माण करणं थांबवतील का? असा सवाल नड्डा यांनी केला आहे. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये भाजपाचं सरकार आहे. तिथं आम्ही गरीब आणि वंचित वर्गाच्या लोकांना मदत करण्यासाठी मोफत लस देण्याची घोषणा केली आहे, असंही नड्डा यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

काँग्रेस मोफत लसीची घोषणा करेल का?

तसेच काँग्रेसला प्रश्न विचारताना त्यांनी म्हटलं की, "काँग्रेस आपल्या राज्यांमध्ये अशा लोकांची मदत करण्यासाठी मोफत लस देण्याची घोषणा करेल का?. दरम्यान, सोमवारी सोनिया गांधींनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

NEET-UG पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल; १७ वर्षीय विद्यार्थ्यानं सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं

क्रीडा विश्वातील 'शू सायन्स': खेळाडूंच्या बुटांचे तळवे प्रत्येक खेळानुसार का बदलतात ? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

Latest Marathi News Live Update: ब्रम्हगाव प्रकरणातील मागण्या मान्य; भिमाशंकर यादव यांचे उपोषण स्थगित

SCROLL FOR NEXT