देश

चीनच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी लष्कराकडे खास बोटी

दीनानाथ परब

नवी दिल्ली: भारतीय लष्कराने (indian army) १७ नवीन बोटी विकत घेतल्या आहेत. यातील बहुतांश बोटी (Army buys boats) पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ सेक्टरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. उद्या या भागात चिनी सैन्याबरोबर (pla) संघर्षाची स्थिती उदभवली, तर जलदगतीने सैन्याची तैनाती करता यावी, यासाठी बहुतांश बोटी या पँगाँग टीएसओ भागात वापरण्यात येतील. भारत-चीनमध्ये मागच्यावर्षीपासून सीमावाद सुरु आहे. पँगाँग टीएसओ (pangog tso sector) सेक्टरच्या फिंगर फोर भागात भारतीय आणि चिनी सैनिक परस्परांना (India-China clash) भिडले होते. (Army buys boats to move troops faster at Pangong Tso amid India China stalemate at LAC)

मागच्यावर्षी १९६२ सालच्या युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारचा मोठा तणाव निर्माण झाला होता. गलवान खोरं आणि पँगाँग टीएसओ फिंगर फोरच्या भागात संघर्ष टीपेला पोहोचला होता. पँगाँग टीएसओमध्ये तर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. हवेत गोळ्यांच्या फैरीही झाडल्या आल्या. दोन्ही देशांचे रणगाडे परस्परांच्या रेंजमध्ये होते. छोटीशी ठिणगी सुद्धा युद्धाला पुरेशी ठरली असती.

अनेक फेऱ्यांच्या लष्करी चर्चेनंतर पँगाँग टीएसओमधून चिनी सैन्य मागे हटले आहे पण भविष्यात पुन्हा इथे संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते. डेसपांग प्लेन्स, हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि डेमचॉकमध्ये अजूनही संघर्षाची स्थिती आहे. इथे पूर्वीसारख तणाव नाहीय. पण अजूनही या भागातून चिनी सैन्य मागे हटलेले नाही. गोवा स्थित एका शिपयार्ड कंपनीकडून या बोटी विकत घेणार असल्याचे लष्करातील सूत्रांनी सांगितले. प्रिंटने हे वृत्त दिले आहे.

भारतीय नौदल या कंपनीने बनवलेल्या बोटींचा वापर करते. काही बोटी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. सप्टेंबरपर्यंत उर्वरित बोटी सोपवल्या जातील. पूर्व लडाखमध्ये सर्वाधिक बोटींचा वापर केला जाईल. अन्य बोटी गरजेनुसार, दुसऱ्याठिकाणी वापरल्या जातील. बोटीची लांबी ३५ फूट असून २० ते २२ लोक या बोटीमध्ये बसू शकतात. ताशी ३७ किमी या बोटींचा वेग आहे. सध्यातरी या बोटींमध्ये कुठल्याही प्रकारचे शस्त्र बसवण्यात आलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. भविष्यात गरजेनुसार हलकी शस्त्र या बोटीमध्ये वापरता येऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT