mm naraven  eskal
देश

एकतर्फी बदल अमान्य : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

विविध भागांतून चीनने माघार घेतली असून हे एक सकारात्मक पाऊल मानावे लागेल.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘ भारतीय लष्कराची (Indian Army) भूमिका स्पष्ट असून देशाच्या सीमांमध्ये एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.’’ असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Army Chief General Manoj Naravne) यांनी आज मांडले. लष्कर दिनाच्या निमित्ताने येथे आयोजित संचलनप्रसंगी बोलताना त्यांनी मागील वर्ष हे लष्करासाठी खूप आव्हानात्मक होते असे सांगतानाच ईशान्येकडील सीमांवरील अस्वस्थतेचा हवाला दिला.

नरवणे म्हणाले की, ‘‘ सीमेवरील तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत आणि चीनदरम्यानची लष्करी चर्चेची चौदावी फेरी नुकतीच पार पडली होती. आतापर्यंत या आघाड्यांवर प्रयत्न झाल्याने विविध भागांतून चीनने माघार घेतली असून हे एक सकारात्मक पाऊल मानावे लागेल. सध्या निर्माण झालेल्या तणावाबाबत उपाय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हिमाच्छादित पर्वतावर तैनात असलेल्या जवानांचे मनोधैर्य देखील पर्वताएवढेच उंच आहे. आमच्या संयमातून स्वतःवरील आत्मविश्वास दिसून येतो पण अन्य लोकांनी

तो आजमावून पाहण्याची चूक करू नये. भारतीय लष्कर देशाच्या सीमांच्या रचनेतील एकतर्फी बदल कोणत्याही स्थितीमध्ये मान्य करणार नाही.’’

‘ड्रॅगन’शी संघर्ष

पॅंगाँग तळ्याच्या परिसरातील रक्तरंजित संघर्षानंतर ५ मे २०२० पासून लडाखमध्ये भारत आणि चीन यांचे सैन्य आमनेसामने आले असून हा तणाव कमी व्हावा म्हणून दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत चर्चेच्या चौदा फेऱ्या पार पडल्या आहेत. सीमेवरील तणाव काही अंशी कमी झाला असला तरी ड्रॅगन वारंवार फुत्कार टाकत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश विदेशात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT