Army Chief Naravane
Army Chief Naravane Army Chief Naravane
देश

नरवणे म्हणाले, लष्करावर गुंतवणूक करा; कारण...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सशस्त्र दलांवर खर्च करणे ही एक गुंतवणूक आहे. जी पूर्ण परतावा देते. याला अर्थव्यवस्थेवर (military) ओझे म्हणून पाहू नका, असे लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे (Army Chief Naravane) म्हणाले. त्यांनी सशस्त्र दलावरील खर्चाचे वर्णन गुंतवणूक असे केले. शेअर बाजार (share market) कोसळल्यानंतर आणि सशस्त्र दल मजबूत असल्यास हजारो गुंतवणूकदार हतबल झाल्यानंतरही एखादा देश हा धक्का सहन करू शकतो, असेही नरवणे म्हणाले. (Major role of the armed forces in the security of the country)

बुधवारी नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीमध्ये ‘फिफ्टी इयर्स ऑफ १९७१ वॉर : अकाऊंट्स फ्रॉम वेटरन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. संकटाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम सर्वांनी पाहिला. कुठेही युद्ध असेल, कोणत्याही क्षेत्रात अस्थिरता असेल, तेव्हा तुम्ही शेअर्सवर, शेअर बाजारावर (share market) थेट परिणाम पाहू शकता. देशाचे सशस्त्र दल (military) बलवान असेल तेव्हाच अशा धक्क्यांना तोंड देता येईल, असेही जनरल नरवणे (Army Chief Naravane) म्हणाले.

देशाच्या सुरक्षेत सशस्त्र दलांची मोठी भूमिका

देशाच्या सुरक्षेत सशस्त्र दलांची मोठी भूमिका असते. इतर अवयवही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना आणि पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू असताना जनरल नरवणे यांचे हे वक्तव्य आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT