Army jawan martyred one terrorist killed in encounter in Jammu and Kashmirs Pulwama 
देश

जम्मू कश्मीरमध्ये चकमक; एक जवान शहीद, एक आतंकावादी ठार

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : जम्मू-कश्मीरच्या (Jammu Kashmir) पुलवामा (Pulwama) भागात बुधवारी आतंकवाद्यांच्या झालेल्या हल्ल्यात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. तर भारतीय सैन्याच्या सुरक्षारक्षकांना एका आतंकवाद्याला ठार करण्यात यश आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, झालेल्या चकमकीत आणखी एक जवान जखमी झाला आहे. सुरक्षा दलाला पुलवामा भागातील कामराजीपोरा गावातील एका बागेत आतंकवादी असल्याची माहिती मिळाली होती. या भागात सुरक्षारक्षकांनी शोध घेतल्यानंतर तेथे चकमक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आतंकवाद्यांनी आधी सुरक्षादलाच्या जवानांवर गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात एका आतंकवादी ठार झाला. तर दोन जवान जखमी झाले  होते. जखमी झालेल्या जवानांपैकी एका जवानाचा उपचारादरम्यान रुग्णालया मृत्यू झाला. 

चकमक झालेल्या ठिकाणांवरून भारतीय सैन्याला एक रायफल आणि काही ग्रेनेड मिळाले आहेत. ठार झालेल्या आतंकवाद्याची ओळख पटली नसून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून चालू आहेत. तसेच त्याचा कोणत्या आतंकवादी संघटनेसोबत संबंध होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून चालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यात दाेन दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अँक्शन मोडवर, तातडीने पंचनाम्याचे निर्देश!

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

SCROLL FOR NEXT