Army Recruitment Sakal
देश

Army job recruitment:संतुलन साधण्यासाठी लष्कर भरतीत बदल

कर्नल सुरेश ; तंदुरुस्तीसह हुशारीचाही समावेश लष्कराच्या भरती प्रक्रियेत करण्यात आलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे लेखी परीक्षेसाठी आता प्रत्येकी ५०० रुपये शुल्क असेल. मात्र, त्यातही भारतीय लष्कर प्रत्येकी २५० रुपये देईल. त्यामुळे, उमेदवारांना प्रत्येकी २५० रुपयेच द्यावे लागतील.

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर- हुशारीबरोबरच ताकदीचे योग्य संतुलन साधण्याच्या हेतूने लष्कराने आपल्या भरतीच्या नियमांत बदल केला आहे,

अशी माहिती लष्कराचे भरती अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी दिली. यापूर्वी लष्करात भरती प्रक्रियेच्या शेवटी लेखी परीक्षा घेतली जात होती. मात्र, आता भरतीच्या पहिल्या टप्प्यातच लेखी परीक्षा घेतली जाईल.

भरतीप्रक्रियेतून निवडले जाणार उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि बुद्धिमान असतील, यावर भर असेल, असेही कर्नल जी.

सुरेश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उमेदवारांच्या शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या या लेखी परीक्षेनंतर घेतल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

कर्नल सुरेश पुढे म्हणाले, की लष्कराच्या भरती प्रक्रियेत करण्यात आलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे लेखी परीक्षेसाठी आता प्रत्येकी ५०० रुपये शुल्क असेल.

मात्र, त्यातही भारतीय लष्कर प्रत्येकी २५० रुपये देईल. त्यामुळे, उमेदवारांना प्रत्येकी २५० रुपयेच द्यावे लागतील. अग्निवीरांच्या भरतीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, या महिन्यात त्याची अधिसूचनाही जारी केली आहे,

असेही त्यांनी सांगितले. लष्कराच्या बदललेल्या भरती प्रक्रियेनुसार, प्रत्यक्ष भरती मेळाव्यापूर्वी ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. भरती प्रक्रियेतील या बदलासंदर्भात लष्कराने वृत्तपत्रांतही जाहिराती दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT