देश

'हनी ट्रॅप'मध्ये अडकला जवान; लष्कराची गुप्त माहिती उघड

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय लष्करातील जवानाला पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकविण्यात आले होते. यादरम्यान या जवानाने लष्करातील गोपनीय माहिती उघड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुप्तचर संस्था (IB), मिलिट्री इंटेलिजेंस आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जात असून, संबंधित जवानाला अटक करण्यात आली आहे.

संबंधित जवान मध्य प्रदेशातील महू येथील इन्फँट्री बटालियन येथे लेखनिक पदावर कार्यरत आहे. भारतीय गुप्तचर संस्थांनी त्याला पाकिस्तानला माहिती पुरवत असताना पकडले. या जवानाला गोपनीय माहिती देण्यासाठी 'हनी ट्रॅप'मध्ये फसविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी या जवानाचा मोबाईल आणि अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, या जवानाचा मोबाईल जप्त करण्यात आल्याने यातून महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT