देश

Kathua Terror Attack: जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाऊ देणार नाही; कथुआ येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण सचिवांच इशारा

Kathua Terror Attack: केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी देखील या हल्‍ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, लष्कर जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता टिकवून ठेवण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. ९ (पीटीआय) ः जम्मू-काश्‍मीरमधील कथुआ येथे सोमवारी जवानांवर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाऊ देणार नाही या हल्ल्यात ज्यांचा हात आहे, त्यांना अद्दल घडविण्यात येईल, असे प्रतिपादन संरक्षण सचिव गिरिधर आरमाने यांनी मंगळवारी केले.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी देखील या हल्‍ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, लष्कर जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता टिकवून ठेवण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले आहे. कथुआ येथे सोमवारी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये पाच जवान हुतात्मा झाले तर पाचजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जवानांनी या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

‘‘या जवानांनी देशासाठी केलेले सर्वोच्च बलिदान देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील, या अत्यंत कठीण प्रसंगी सर्व देशवासीय या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या आणि जखमी झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांबरोबर ठाम उभे आहेत. या भागात दहशतवादविरोधी मोहीम हाती घेण्यात आली असून आपले जवान येथे शांतता टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत,’’ असे प्रतिपादन सिंह यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistani Spy Case: 'ई-रिक्षावाली' निघाली पाकिस्तानी हेर! मीरा ठाकूरचा मुंबई पोलीसशी काय संबंध? वाचा पूर्ण प्रकरण

Latest Marathi News Live Update : देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर...; ममता बॅनर्जी संतापल्या

India Lockdown Strategy : मध्यपूर्वेत तणाव ! भारतात लॉकडाऊन लागणार ? पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे मोठे विधान

Rinku Singh Video: लवकरच येऊन जॉइनिंग लेटर घेईन'; रिंकू सिंहने योगींचे मानले आभार! उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसह नव्या इनिंगला सुरुवात

Hemant Godse Video Viral : भोंदूबाबा अशोक खरात माजी खासदाराचा हात बघून भविष्य सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल; लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य जाणून घेतल्याची चर्चा!

SCROLL FOR NEXT