देश

भारतीयांनो, कोरोनाबाबत महत्त्वाची बातमी; तब्बल 1.62 कोटी...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरस अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. भारतातही याचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत 48,661 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. ही एक चिंतेची बाब बनत आहे.

सध्या संपूर्ण जगात कोरोनाबधितांची संख्या 1,62,05,467 वर गेली आहे. तर आतापर्यंत 6,48,476 हजारांहून अधिक जणांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर लगाम लावण्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. भारतात आत्तापर्यंत 13,85,522 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8,85,576 जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. ते सध्या कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र, 32,063 कोरोनाबाधित रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,67,882 वर गेली आहे. 

दीड कोटींहून अधिक चाचण्या

शनिवारी एका दिवसात तब्बल 4,42,263 कोरोना व्हायरसच्या चाचण्या झाल्या. तर आत्तापर्यंत 1,62,91,331 कोरोना चाचण्या भारतात करण्यात आल्या.

महाराष्ट्रात साडेतीन लाखांवर कोरोनाबाधित

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, आत्तापर्यंत 3,66,368 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1,45,785 ऍक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातून 2,07,194 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र, 13,389 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

तमिळनाडूतही रुग्णसंख्या दोन लाखांवर...

महाराष्ट्रानंतर तमिळनाडूतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. तमिळनाडूतील 2,06,737 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर सध्या 52,273 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 1,51,055 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

ओडिशात 1376 नवे कोरोनाबाधित रुग्ण

ओडिशात नव्या 1376 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता ही संख्या 25,389 वर गेली आहे. त्यापैकी 15,928 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात 9,287 ऍक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT