देश

भारतात कोरोनाग्रस्त रुग्ण होताहेत बरे; सध्या...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीचे अनेक पर्याय वापरले जात आहेत. मात्र, तरीदेखील देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. हा एक चिंतेचा विषय बनत आहे.

तसेच आता भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 1,46,208 वर गेला आहे. पण कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 61,052 रुग्णांवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 4.0 ची घोषणा देशात केली. पण यामध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार अनेक सेवांमध्ये सूट दिली जात आहे. पण दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला असून, रुग्णांची एकूण संख्या 1,46,208 झाली आहे.

सध्या देशात 80,969 कोरोनाचे ऍक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती वर्ल्डोमीटर्सवर देण्यात आली आहे. यातील विशेष बाब म्हणजे 61,052 रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णायातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 4,167 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आत्तापर्यंत 31 लाखांहून अधिक चाचण्या

देशात वाढत चाललेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या हा एक चिंतेचा विषय बनत आहे. परंतु, प्रशासनाकडूनही विशेष खबरदारी घेतली जात आहे. आत्तापर्यंत 31,26,119 कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सध्या 80,969 ऍक्टिव्ह केसेस आहेत.

8 हजारपेक्षा जास्त रुग्णांची प्रकृती चिंताजनक

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत 4,167 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर सध्या 8,944 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.  

दिल्लीत 412 नवे केसेस

राजधानी दिल्लीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या 412 नवे केसेस समोर आली आहेत. त्यामुळे आता दिल्लीत रुग्णांचा आकडा 14,465 झाला आहे. तर यामध्ये आत्तापर्यंत 288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT