Around Rs 1 crore in cash seized from an auto-rickshaw near Bengaluru Karnataka election 2023  
देश

Video : पैशांचा पाऊस… चक्क ऑटो रिक्षात सापडंलं एक कोटींचं घबाड

रोहित कणसे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा संपत आल्याने निवडणूक आयोग अवैध पैसा आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाही आज करोडोंची रोकड पोलिसांच्या हाती लागल्याचा प्रकार समोर आला. बंगळुरू शहरातील एसजे पार्क पोलिसांनी चक्क एका ऑटोमधून १ कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून त्यांनी २ जणांना अटक केली आहे.

सुरेश आणि प्रवीण अशी आरोपींची नावे आहेत. ऑटोरिक्षात ठेवलेल्या एक कोटीच्या अवैध रोकडसह दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एचडी पार्कमधील कॉलिंगाराल बसस्थानकाजवळ एका ऑटोतून येत होते. तेव्हाच पोलिसांनी त्यांना चेकपोस्टजवळ अडवून झडती घेतली असता ऑटोमधून एक कोटी रुपयांची अवैध रोकड जप्त करण्यात आली.

हेही वाचा - Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांनी दोघांनाही रोख रकमेसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर करु शकलो नाहीत. दोघांकडे पैशांसंबंधी कोणतीही कागदपत्रे नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी सर्व रक्कम जप्त करून आयकर विभागाकडे सोपवली आहे. पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या बाबतीत सुरू आहे. अशाच पध्दतीने यापूर्वी ६ एप्रिल रोजी एकूण ५० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली होती.

राज्यात आचारसंहिता लागू आहे

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे ज्यामध्ये योग्य कागदपत्रांशिवाय मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जाण्याची परवानगी नाही. मात्र तरीही लाखो-कोटींची रोकड जप्त केली जात आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी एकाच टप्प्यात होणार आहे. तसेच १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman in Cave : परदेशी लोकांना भारत स्वर्गासारखा, 'त्या' रशियन महिलेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने असे का म्हटले?

Miraj Dangal : मिरजेत दोन गटांत राडा, जातीविषयी द्वेष निर्माण करणारे वक्तव्य; नेमकं रात्री काय घडलं?, पोलिसांची भूमिका काय

Laxmi Niwas : अखेर तो क्षण आलाच ! जान्हवी शिकवणार जयंतला धडा; लेखिकेचंही कौतुक करत प्रेक्षक म्हणाले "ज्जे बात !"

Latest Marathi News Live Update : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा रुग्णालयात दाखल; आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Pune Weather Update : पुण्यात तापमानाचा पारा चढला, पुढील काही दिवसांत उकाडा वाढणार

SCROLL FOR NEXT