देश

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी

सकाळ न्यूज नेटवर्क

कोलकता : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याविरुद्ध बंकशल न्यायालयाने आज अटक वॉरंट जारी केले. थरूर यांनी गेल्या वर्षी केलेल्या "हिंदू पाकिस्तान' या विधानाबद्दल हे वॉरंट काढण्यात आले आहे. ऍड. सुमीत चौधुरी यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या आधारे महानगर दंडाधिकाऱ्यांनी हे वॉरंट जारी केले. 

शशी थरूर यांना अनेकदा समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, थरूर न्यायालयापुढे हजर न झाल्यामुळे हे वॉरंट काढण्यात आल्याचे कळते; मात्र त्याला दुजोरा मिळाला नाही. "भाजपने 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकल्यास ते "हिंदू पाकिस्तान'सारखी स्थिती निर्माण करतील,' असे विधान थरूर यांनी गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये केले होते.

तिरुअनंतपुरमधील सभेत बोलताना, भाजप घटनेत बदल करेल आणि तेथे अल्पसंख्यकांना किंमत नसेल, असेही ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nashik Railway: रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! उरळीवरून जाणार पुणे-नाशिक लोहमार्ग; ताशी १६० किलोमीटर वेग, नेमका कसा असेल मार्ग..

Operation tiger : ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेशाचा १९ जूनचा मुहूर्त ‘तांत्रिक’, ‘भावनिक’ बाबींमुळे टळणार? एकनाथ शिंदेंची सावध खेळी

मोठी बातमी! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीचे प्रवेश पुढच्या वर्षीच; ‘AICTE’ची मान्यता नाही; आता वर्षभरात पदभरती, इमारतीची डागडुजी, संचालक म्हणाले...

आजचे राशिभविष्य - 18 जून 2026

18 जून 2026 पंचांग! गुरुपुष्यामृत योगासह वैनायकी गणेश चतुर्थीचा शुभ दिवस

SCROLL FOR NEXT