Prajwal Revanna 
देश

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

प्रज्वल रेवण्णा यानं महिलांवर लैंगिक अत्याचार करुन त्याचे हजारो व्हिडिओ तयार केले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बंगळुरु : महिलांवर लैंगिक अत्याचार करुन त्याचे हजारो व्हिडिओ तयार करणारा कर्नाटकातील जेडीएसचा खासदार प्रज्वल्ल रेवन्ना याच्याविरोधातील फास आता आणखी आवळला आहे. कारण त्याच्या विरोधातील कोर्टानं अटक वॉरंट काढलं आहे. पण सध्या रेवण्णा हा भारतातून फरार झाला आहे. टाईम्स नाऊनं याबाबत वृत्त दिलं आहे.

एसआयटीच्या मागणीनुसार कर्नाटकातील कोर्टानं हसनमधील जेडीएस खासदाराविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. नोटीस बजावूनही प्रज्वल रेवण्णा एसआयटीसमोर हजर झाला नसल्यानं त्याच्याविरोधात आता कोर्टानं अटक वॉरंट काढलं आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याच्या कथित व्हिडीओ प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रेवण्णा हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जेडीएसचा उमेदवारही आहे.

दरम्यान, कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीनं त्याच्याशी संबंधित कथित स्लीझ व्हिडिओंचा तपास करणारी टीम आत्मसमर्पण करण्यासाठी बंगळुरूला परत येण्याची वाट पाहत आहेत. 33 वर्षीय रेवण्णानं 27 एप्रिल रोजी डिप्लोमॅटिक पासपोर्ट वापरून देश सोडला आहे, सध्या तो जर्मनीत असल्याचा संशय आहे. कर्नाटक सरकारनं त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच करा; समृद्धीवर चक्काजाम; आंदोलक-पोलीस आमने-सामने

Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींचा जुलैचा हप्ता १५ ऑगस्टपर्यंत जमा होणार? मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

बापरे! झी मराठीच्या 'या' मुख्य नायिकेला झालंय तरी काय? कपाळावर पट्टी आणि नाकाला... अभिनेत्रीला पाहून प्रेक्षक म्हणाले...

Gude-Pachgani Tourism: ‘मिनी महाबळेश्वर’चे पठार पर्यटकांनी फुलले; गुढे-पाचगणीला पर्यटकांची पसंती; जायचं कसं?

Marathi News Live Updates : नेत्यांच्या डोक्यात राजकारणाची मस्ती; जरांगे पाटील मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवर संतापले

SCROLL FOR NEXT