BJP 
देश

कलम 370, तोंडी तलाक ही भाजपची विधानसभा निवडणुकीची 'अस्त्रे'

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे चाणक्‍य गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून सांगितले जात होते, त्या नरेंद्र मोदी सरकारने आपल्या जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीने प्रत्यक्षात आणल्या असतील, तर भाजपने त्याचा वापर प्रचारत करण्यात गैर ते काय? असा सवाल सत्तारूढ नेते विचारत आहेत. सदस्यता नोंदणी मोहीमेनंतर लगेचच भाजप या दोन्ही मुद्यांचा जोरदार व आक्रमक प्रचार मोहीम सुरू करण्याची शक्‍यता आहे. 

दिल्ली व महाराष्ट्रासह हरियाणा व झारखंडमध्येही पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. यातील दिल्ली वगळता तीन राज्यांत सध्या भाजप सत्तेवर आहे. दिल्लीच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीच्या आसपास होणे शक्‍य आहे. एका भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर 'सकाळ'ला सांगितले की, या साऱ्या निवडणुकांत वरील दोन्ही मुद्दे प्रमुख प्रचाराचे मुद्दे बनविण्याची योजना आखण्यात येत आहे. 'मोदी है तो मुमकीन है' अशी टॅगलाईन याला दिली जाईल.

काश्‍मीरला खास दर्जा देणारे व भारतासाठी गेली सात दशके अनावश्‍यक डोकेदुखी ठरत आलेले कलम 370 संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेषतः राज्यसभेत मंजूर होणे, हा जनसंघ-भाजपच्या संसदीय कारकिर्दीतील मानाचा तुरा मानला जातो. याचे पडसाद काय उमटतात, हे गूढ असले व काश्‍मीरमध्ये जनआंदोलनांना सुरवात झालेली असली तरी हे कलम रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे कोणीही नाकारू शकत नाही, असा दावा या नेत्याने केला.

काँग्रेसमध्येही या मुद्यावरून दोन गटतट पडल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व निवडणूक राज्यांमध्ये गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंतच्या बूथप्रमुखांना या दोन्ही निर्णयांबाबतचे दस्तावेज पेनड्राईव्ह व पुरेशा इंटरनेट सामग्रीसह पोहोचविण्याची सूचना भाजप नेतृत्वाने केली आहे. राज्यातील भाजपच्या बैठकांमध्ये या दोन्ही कायद्याची चर्चा प्रत्येकवेळी करण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत. दिल्लीत अलीकडेच सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक झाली. पंडित पंत मार्गावरील या बैठकीत कलम 370 बाबत एक दृकश्राव्य सादरीकरण व तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही निर्णयांमुळे भाजपची झोळी मतांनी भरून जाईल, असे फीडबॅक पक्षनेतृत्वाला मिळाले आहेत.

तोंडी तलाबंदी कायद्यावर मुस्लिम महिलांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचीही माहिती भाजपकडे आली आहे. दिल्लीत या कायद्यामुळे व्हॉटस्‌ऍपवर तलाक देणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी हे दोन्ही मुद्दे उपयुक्त ठरतील अशी भाजपला आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

Corporation Water Crasis : कोल्हापुरात पाणीपुरवठ्यावरून वाद; महापालिका-जलसंपदा आमनेसामने, पदाधिकाऱ्यांची कडक भूमिका

Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Financial Planning: 50,000 पगारातही बचत नाही? 15 दिवसांत पैसे संपतात? तज्ञांनी सांगितलेले हे 5 नियम वापरा आणि पैशांची टेन्शन संपवा

SCROLL FOR NEXT