Article-370 
देश

आता पुन्हा निर्णय फिरविणे शक्‍य नाही - केंद्र सरकार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करून या राज्याचा भारतीय संघराज्याशी संबंध प्रस्थापित करण्यात आला आहे, आता पुन्हा हा निर्णय फिरविणे शक्‍य नसल्याचे मत केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडले. 

दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या असून, त्यांच्यावर आज न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली. यामध्ये न्या. एस. के. कौल, न्या. आर. सुभाष रेड्डी, न्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्यकांत यांचा समावेश आहे.

आजच्या सुनावणीदरम्यान ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारची बाजू मांडतानाच हा निर्णय परत फिरविणे कसे अशक्‍य आहे, हे न्यायालयास पटवून दिले. जम्मू आणि काश्‍मीरचे सार्वभौमत्व हे पूर्णपणे तात्पुरते होते. आपण संघराज्य आहोत, असे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. ॲड. राजीव धवन यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. ते म्हणाले की, ‘‘पहिल्यांदाच राज्यघटनेतील तिसऱ्या कलमाचा आधार घेत सरकारने एखादा प्रदेश हा केंद्रशासित केला असून, उद्या अन्य राज्यांबाबतदेखील ते हाच कित्ता गिरवू शकतात. केंद्र सरकारने या राज्यामध्ये जाणीवपूर्वक राष्ट्रपती राजवट लागू केली होती.’’ धवन यांनी या वेळी जम्मू-काश्‍मीरचा नकाशाही न्यायालयात झळकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ‘कर्मकांडां’ची लांबलचक यादी! नाशिकचा भोंदू बाबा इंटरनेटवर ट्रेंडिंग; अशोक खरात केसने गाठली गुगल टॉप सर्च कॅटेगरी

Iran-Israel War: पाकिस्तानी जहाजाला इराणने दिलं हाकलून! भारताला मात्र मुभा, होर्मुजच्या सामुद्रधुनीत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : अंबरनाथ येथील वांद्रापाडा परिसरात भटक्या कुत्र्याचा विद्यार्थिनीवर हल्ला

Pachod News : पंचवीस वर्षापासून थेरगाव येथे हरिनाम सप्ताहसह गुढीपाडव्या निमित्त घरावर सात दिवस डोलतात गुढ्या

मिस कलरफुल पूजा सावंतचं स्कीन केअर रुटीन काय? अभिनेत्री म्हणाली, 'माझ्याही चेहऱ्यावर आधी मुरूम होते...

SCROLL FOR NEXT