देश

Article 370 : निर्णय राजकीय नाही, तर राष्ट्रीय : उपराष्ट्रपती

पीटीआय

अमरावती/श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय राजकीय नसून राष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज केले. ही काळाची गरज होती, असे या निर्णयाचे समर्थन नायडू यांनी केले. 

विजयवाडा येथे प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करताना उपराष्ट्रपती नायडू यांनी काश्‍मीरच्या मुद्यावर भाष्य केले. हा निर्णय प्रलंबित होता. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय देशासाठी चांगला आहे. हा राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मुद्दा आहे, असे नायडू म्हणाले. याबाबतचे विधेयक राज्यसभेत सादर होतानाची आठवणही त्यांनी सांगितली.

"हे विधेयक सादर झाल्यानंतर मी डोळ्यांत तेल घालून सर्व नियमांचा अभ्यास केला. या मुद्यावर चर्चा, वादविवाद होऊन नियमांची स्पष्टता यावी, अशीच मी इच्छा मनात धरली होती. पंडित नेहरूंनी 1963 मध्येच सांगितले होते की, हे कलम तात्पुरते आहे. संसदेत तयार झालेले 110 कायदे हे जम्मू-काश्‍मीर वगळता सर्व देशात लागू होत होते,' असे नायडू यांनी सांगितले. 

अद्यापही अस्वस्थ शांतता

काश्‍मीर खोऱ्यात शांतता असली तरी जनजीवन अद्यापही सुरळीतपणे सुरू झाले नसल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. येथे सलग 23 व्या दिवशी बाजार आणि शाळा बंद होत्या. सार्वजनिक बसगाड्याही आगारातच उभ्या होत्या. काश्‍मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणची संचारबंदी उठविली असली तरी, सुरक्षा व्यवस्था अद्यापही तैनात आहे.

दरम्यान, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अतिरिक्त महासंचालक झुल्फिकार हसन यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेत त्यांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT