jammu kashmir election,gupkar alliance, bjp, ddc election 
देश

Article 370: जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार? CJI चंद्रचूड यांच्या प्रश्नानंतर सरकारनं दिली 'ही' माहिती

कलम ३७० हटल्याच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याला चार वर्षे झाली पण इथं अद्याप निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. केंद्र सरकार इथं निवडणुका कधी घेणार आहे? असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड सुप्रीम कोर्टात केला. त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उत्तर दिलं आहे. (Article 370 When will elections be held in Jammu and Kashmir Government gave info after CJI Chandrachud question)

सरन्यायाधीशांनी विचारले प्रश्न?

कलम ३७० हटल्याच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली जात आहे. चंद्रचूड यांनी सवाल करताना सरकारला असंही विचारलं की, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कधी बहाल होणार? जर निवडणुका होत नसतील तर केंद्राचा जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा हेतू नाही का? यावर तुषार मेहता म्हणाले, नाही. यावर चंद्रचूड म्हणाले, हे किती शाश्वत आहे? तुम्ही निवडणूक कधी घेणार आहात की नाही? (Latest Marathi News)

सरकारनं दिली उत्तरं

यावर उत्तर देताना तुषार मेहता म्हणाले, "निवडणुकांची तयारी सध्या सुरु आहे, आम्ही निवडणुका घेण्याच्या दिशेने चाललो आहोत" त्यावर "लोकशाही प्रक्रिया राज्यात सुरू होणं महत्वाचं आहे, त्यासाठी रोडमॅप तयार करा," असे निर्देशही CJI चंद्रचूड यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : हुंड्यासाठी पत्नीला मुलासमोर जिवंत जाळलं, पतीचा एन्काउंटर; पोलिसांनी झाडली गोळी

Trending News : AI ची कमाल ! महिलेला मिळाला २५ वर्षांपूर्वी गेलेला आवाज, नेमका कसा घडला चमत्कार?

Joint Pain: पावसाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या उपचार कसे करावे

Latest Marathi News Updates : जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Online Shopping Discount : कपडे अन् इतर वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतात? तुमच्याचं फायद्याचं आहे, पाहा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT