Pema Khandu  Sakal
देश

Pema Khandu : अरुणाचलमध्ये पेमा खांडू यांचा करिष्मा

२०११ पेमा खांडू यांचे वडील आणि अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर कोसळल्याने अपघाती निधन झाल्यानंतर पेमा खांडू प्रकाशझोतात

सकाळ वृत्तसेवा

इटानगर : अरुणाचलमध्ये पेमा खांडू यांनी पुन्हा एकदा करिष्मा करून दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला पुन्हा एकदा विजय मिळवून दिला आहे. २०१६मध्ये राष्ट्रपती शासन लागू झालेल्या अरुणाचलमधील परिस्थिती पूर्वपदावर आणणाऱ्या व आव्हानात्मक परिस्थितीमधून सुरू झालेला खांडू यांचा राजकीय प्रवास...

  • २००० काँग्रेसमध्ये प्रवेश

  • २०११ पेमा खांडू यांचे वडील आणि अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर कोसळल्याने अपघाती निधन झाल्यानंतर पेमा खांडू प्रकाशझोतात

  • वडिलांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये विजय

  • काँग्रेसचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या सरकारमध्ये राज्याच्या पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी

  • २०१६ घटनात्मक पेचप्रसंगामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू

  • राष्ट्रपती राजवट हटविण्यात आल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणाऱ्या कालिकोह पुल यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद

  • सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तुकी यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद

  • तुकी यांचा अल्पकाळातच राजीनामा

  • पेमा खांडू यांच्याकडे मुख्यमंत्रिपद

  • सत्तेत राहण्यासाठी यांचे दोनदा पक्षांतर प्रथम काँग्रेसमधून पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेश या पक्षात आणि त्यानंतर लवचिक धोरण स्वीकारत भाजपमध्ये प्रवेश

  • २०१९ मुक्तो या विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी

  • २०२४ मुक्तो येथून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी

राजकारणापलीकडे

पेमा खांडू यांची ओळख एक संगीतप्रेमी आणि क्रीडाप्रेमी म्हणून आहे. पारंपरिक संगीताच्या संवर्धनासाठी राज्यस्तरावर सांगितिक स्पर्धांचे आयोजन. त्याचप्रमाणे क्रिकेट, फुटबॉल यांसह अन्य क्रीडाप्रकारांच्या सामन्यांचे आयोजन करून या क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी खांडू प्रयत्नशील असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT