Arundhati Roy awarded Pen Pinter Prize 2024  
देश

Arundhati Roy : अरुंधती रॉय यांना ब्रिटनचा ‘पेन पिंटर' पुरस्कार जाहीर; कोणाला अन् का मिळतो हा पुरस्कार? वाचा

Arundhati Roy awarded Pen Pinter Prize 2024 : ब्रिटिश नाटककार नोबेल विजेते हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ पेन पिंटर पुरस्कार दिला जातो. येत्या दहा ऑक्टोबर रोजी ब्रिटिश लायब्ररी येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा


लंडन, ता. २७ (पीटीआय): प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना ब्रिटनचा बहुचर्चित ‘पेन पिंटर पुरस्कार-२०२४’ जाहीर झाला आहे. ब्रिटिश नाटककार नोबेल विजेते हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ पेन पिंटर पुरस्कार दिला जातो. येत्या दहा ऑक्टोबर रोजी ब्रिटिश लायब्ररी येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

पेन पिंटर पुरस्कार हा दरवर्षी धाडसात्मक लेखन करणाऱ्या लेखकांना देण्यात येतो. सुरक्षेची तमा न बाळगता आपले विचार परखडपणे मांडणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या लेखकांना या पुरस्काराने गौरविण्यात येतो. हा पुरस्कार ब्रिटिश मानवाधिकार कार्यकर्ता आणि लेखकांची स्वयंसेवी संस्था इंग्लिश पेन यांच्याकडून दिला जातो.

आपले विचार बिनधास्त मांडणाऱ्या लेखकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. २००९ पासून नोबेल विजेते हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यास सुरवात केली. पिंटर हे नोबेल विजेते, नाटककार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. अरुंधती रॉय यांना १९९७ च्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स’साठी बुकर प्राइजने सन्मानित केले होते. रॉय यांना नरेंद्र मोदी सरकारच्या टीकाकार मानल्या जातात. त्या भारतासह जगभरात मानवाधिकार उल्लंघन करणाऱ्या घटनांवर परखडपणे लेखन करतात. या पुरस्कारासाठी तीन न्यायधीशांच्या मंडळाने अरुंधती रॉय यांची निवड केली. या मंडळात इंग्लिश पेनचे अध्यक्ष रूथ बॉर्थविक, अभिनेता खालिद अब्दुल्ला आणि लेखक रॉजर रॉबिन्सन यांचा समावेश होता.

पेन पिंटर प्राइज पुरस्कार जाहीर झाल्याने मला आनंद होत आहे. हेरॉल्ड पिंटर आज असते तर त्यांनी सध्याच्या काळात आकलनापलिकडे गेलेल्या बदलत्या जगाबाबत लेखन केले असते. ते आज आपल्यासोबत नाहीत, परंतु आपल्यापैकी कुणाला त्यांची जागा घ्यावी लागेल.
- अरुंधती रॉय, लेखिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahu Maharaj Document : डोंगर गावात सापडलं 1709 मधील राजर्षी शाहू महाराजांचं राजाज्ञापत्र; काय आहे त्या कापडी पिशवीतलं गुपित? 10 पत्रांनी उलगडला इतिहास

Yashwantrao Statue Solapur: साेलापूरातील यशवंतरावांचा पुतळा ३ वर्षांपासून अच्छादनात! सुशोभीकरण पूर्णत्वाकडे; महाराष्ट्र दिनी तरी व्हावे पुतळ्याचे दर्शन

Latest Marathi News Live : सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा कट उधळला, नऊ संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांकडून अटक

IPL 2026 : सात पैकी पाच सामन्यात पराभव, तरीही मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये जाणार? कसं असेल समीकरण...

'बहिण गर्भवती असताना त्यांनी...' अन्नू कपूरने सांगितलं ओम पुरी यांचं सत्य, म्हणाले...'माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद केलं'

SCROLL FOR NEXT