Delhi CM Arvind Kejriwal sakal
देश

Arvind Kejriwal : केजरीवालांचे भाजपला प्रत्युत्तर तिकिटे विकण्याचा आरोप

आम आदमी पार्टीने एमसीडी निवडणुकीसाठी तिकिटे विकल्याचा दावा

मंगेश वैशंपायन : सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून तिकिटाची खरेदी विक्री होत असल्याच्या भाजपने जारी केलेल्या स्टिंग व्हिडिओवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी“भाजपचे हे नवीन नाटक आहे”, या शब्दात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आम आदमी पार्टीने एमसीडी निवडणुकीसाठी तिकिटे विकल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला होता. याप्रकरणी केजरीवाल यांनी मौन का बाळगले आहे, असे भाजप नेते सातत्याने सांगत होते त्याला केजरीवाल यांनी आज पहिल्यांदा उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तराचा दुसरा भाग गुजरातच्या प्रचारादरम्यान ऐकायला मिळेल असे मानले जाते.

भाजपने समोर आणलेल्या या स्टिंग ऑपरेशनवर केजरीवाल म्हणाले की, “भाजप दररोज एक नवीन नाटक दिल्लीकरांसमोर (नौटंकी) आणत आहे. कधी दारूचा घोटाळा झाल्याचे भाजप म्हणतो, त्याचीही चौकशी झाली. दारू घोटाळ्यात काहीही सापडले नाही. “हा केवळ घोटाळा होता, त्यात काहीही सापडले नाही”, असे हास्यास्पद विधान भाजप नेत्यांनी केले. मग शाळा खोल्या बांधकाम, बस वाहतूक यामध्येही भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार घोटाळा झाला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सूड घेण्याच्या भावनेने तपास यंत्रणांनी चौकशी केली. त्यापैकी एकाही प्रकरणात ठोस काहीच सापडले नाही, असे केजरीवाल म्हणाले. अगदी चार दिवसांपूर्वीही ते (भाजप नेते ) म्हणाले होते की, महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात घोटाळा झाला. त्याचीही चौकशी भाजपने करून घ्यावी. त्यांना आणि तपास यंत्रणांना कोणीही अडवलेले नाही असे आव्हान केजरीवाल यांनी दिले.

दरम्यान महापालिका निवडणुकीच्या मतदानाला जेमतेम 13 दिवस राहिल्याने संसदेपासून काही पावलांवर असलेल्या दिल्ली भाजप प्रदेश कार्यालयात सध्या प्रचंड गजबज आहे. स्टार प्रचारक आणि नेते यांची वर्दळ इथे वाढली आहे. भाजप रोज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर नवनवीन आरोप करत आहे. भ्रष्टाचार विरोधाचे नाव घेऊन स्थापन झालेला आम आदमी पक्ष आज संपूर्ण भ्रष्टाचारात बुडाला आहे. एकेकाळी भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या या पक्षाचे आता “हप्ता वसुली” हे एकच काम उरले आहे असा भाजप आरोप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.

या ऑपरेशनमधून हे स्पष्ट झाले की केजरीवाल यांच्या पक्षाने केवळ महापालिका निवडणुकीतच नव्हे तर या आधीच्या विधानसभेच्या निवडणुकीतही तिकिटे विकली होती असा आरोप भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT