arvind kejriwal and himanta biswa sarma 
देश

सरकारी शाळा बघायला कधी येऊ? केजरीवालांचा भाजपशासित राज्याच्या CM ला सवाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजपनेते तथा आसामचे मुख्यमंत्री यांच्यात सुरू असलेले ट्विटरवॉर शनिवारीही कायम आहे. केजरीवाल यांनी हिमंता विश्वास शर्मा यांना आसामच्या शाळा पाहण्यासाठी कधी येऊ असा खोचक सवाल केला. (Arvind Kejriwal news in Marathi)

केजरीवाल यांनी शाळा बंद करणे हा उपाय नसून देशात आणखी शाळा उघडण्याची गरज असल्याचे ट्विट केल्यानंतर बुधवारी सोशल मीडियावर शर्मा आणि त्यांच्यात वाद सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी आसाममधील काही शाळा "बंद" करण्यात आल्याचा दावा करणारी बातमी शेअर केली होती.

केजरीवाल यांनी आज ट्विट केले की, "आमच्या येथे एक म्हण आहे. कोणीही "मी कधी येऊ" असे विचारतं तेव्हा आम्ही म्हणतो, "कधीही या" म्हणजे "कधी येऊ नका". मी तुम्हाला विचारले की "तुमच्या सरकारी शाळा बघायला कधी येऊ" त्यावर तुम्ही काहीही सांगितलं नाहीस. मग मी कधी येऊ ते सांगा, असंही केजरीवाल म्हणाले.

शुक्रवारी शर्मा यांच्या वक्तव्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हे ट्विट केले आहे. शर्मा यांनी ट्विटच्या मालिकेत दिल्ली आणि आसाममधील फरक सांगून केजरीवालांची खिल्ली उडवली होती. शर्मा यांचे ट्विट म्हटलं होतं, "प्रिय केजरीवालजी, तुमचे अज्ञान, दु:ख देणारे आहे. आसाम हे दिल्लीपेक्षा ५० पट मोठे आहे. आमच्या 44,521 शाळांमध्ये 65 लाख विद्यार्थी शिकत आहेत आणि तुमच्या इथे हजाराहून अधिक शाळा आहेत. आमच्याकडे दोन लाख समर्पित शिक्षक आणि 1.18 लाख मध्यान्ह भोजन कामगार आहेत.

आणखी एका ट्विटमध्ये शर्मा म्हणाले होते, “जेव्हा तुम्ही आसाममध्ये याल तेव्हा मी तुम्हाला आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जाईन, जे तुमच्या मोहल्ला क्लिनिकपेक्षा हजार पटीने चांगले आहेत. तुम्ही आमच्या हुशार सरकारी शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही भेटाल. शर्मा पुढं म्हणाले की, तुम्ही देशाला नंबर वन बनवण्याची चिंता सोडून द्या, मोदीजी तेच करत आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT