देश

दिल्लीतील रुग्णालये स्थानिकांसाठी राखीव;केजरीवालांची घोषणा 

पीटीआय

नवी दिल्ली - राजधानीतील खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राज्य सरकार आणि काही खासगी मालकीची रुग्णालये केवळ दिल्लीतील नागरिकांच्या उपचारासाठी उपलब्ध राहतील अशी घोषणा केली आहे. मध्यंतरी राजधानातील अनेक खासगी रुग्णालयांतील खाटांच्या उपलब्धतेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. काही खासगी रुग्णालये सर्वसामान्यांवर उपचार करत नसल्याची बाब उघड झाली होती. 

दिल्ली सरकारने आज राज्याच्या सर्व सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य राज्यांतील रूग्ण हे दिल्लीत उपचारासाठी येतील या भीतीने सुरवातीला हा निर्णय घेण्यात आला होता. दिल्ली राज्य सरकारच्या मालकीच्या रुग्णालयांतील दहा हजार खाटा या स्थानिकांसाठी राखून ठेवल्या जाणार असून केंद्राच्या मालकीच्या रुग्णालयांत मात्र सर्वांना उपचार घेता येतील. उद्यापासून (ता.८) दिल्लीच्या सीमा खुल्या होणार आहेत. 

समितीच्या सूचनेनंतर निर्णय 
राज्य सरकारने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय विशेष समितीच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून या डॉक्टरांच्या समितीच्या अंदाजानुसार जून महिन्याच्या अखेरपर्यंत राजधानीत पंधरा हजार खाटांची आवश्‍यकता भासेल. सध्या आमच्याकडे नऊ हजार बेड असून अन्य राज्यांना त्यांचा वापर करण्याची परवानगी दिल्यास ते देखील आमच्या हातून जाऊ शकतात अशी भीती केजरीवाल यांनी व्हर्च्युल प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिल्लीतील बेड केवळ दिल्लीकरांसाठी, मुंबईतील मुंबईकरांसाठी आणि कोलकत्यातील बेड केवळ तेथील नागरिकांसाठीच कसे काय राखून ठेवले जाऊ शकतात. 
देशातील कोणत्याही भागातील रूग्ण दिल्लीत उपचार घेऊ शकतो. याबाबतीत आपण संवेदनशील असायला हवे? 
मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीयमंत्री 

मॉल्स रेस्टॉरंट उघडणार 
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उद्या (ता.८) पासून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील मॉल्स, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे, हॉटेल, लग्नसमारंभाचे हॉल आणि मंगल कार्यालये मात्र बंदच राहतील असेही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाहीर केले. लॉकडाउनमुळे मागील दोन महिन्यांपासून ही स्थळे बंदच होती. केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार ही सर्वस्थळे उद्यापासून खुली केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

दिल्लीत दारू स्वस्त 
दिल्लीत आप सरकारने मद्यावर लावण्यात आलेले सत्तर टक्के विशेष कोरोना शुल्क माघारी घेण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारपासून येथील दारू आणखी स्वस्त होणार आहे. दुसऱ्या बाजूला सर्वच प्रकारच्या मद्यावरील मुल्यवर्धित कर मात्र २० टक्क्यांवरून २५ टक्के करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. केजरीवालांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT