Arvind Kejriwal announces rs 7,000 bonus for govt employees ahead of Diwali  Sakal
देश

Arvind Kejriwal: दिल्ली सरकारची दिवाळी भेट! मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाहीर केला तब्बल 'इतक्या' हजारांचा बोनस

Arvind Kejriwal Govt: दिवाळीपूर्वी दिल्ली सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे

राहुल शेळके

Arvind Kejriwal Govt: दिवाळीपूर्वी दिल्ली सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोनस जाहीर केला आहे. ते म्हणाले की, दिल्ली सरकारचे सर्व कर्मचारी माझे कुटुंब आहेत.

आम्ही दिल्ली सरकारच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी कर्मचाऱ्यांना 7,000 रुपये बोनस देत आहोत. सीएम केजरीवाल यांनीही सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ली सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपले कुटुंब म्हणत त्यांनी दिल्लीतील चांगल्या कामाचे श्रेय त्यांना दिले. ते म्हणाले, 'मी त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे.

शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा इत्यादींमध्ये दिल्ली सरकारने गेल्या 8 वर्षात केलेल्या सर्व कामांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांनी बजावली आहे. या कर्मचार्‍यांच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे आम्ही दिल्लीला दिल्लीकरांची स्वप्ननगरी बनवण्यात यशस्वी झालो आहोत.

मुख्यमंत्री म्हणाले की, हा सणांचा महिना आहे. सणासुदीच्या काळात आम्ही ग्रुप बी आणि ग्रुप सी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 7,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, 'सध्या ग्रुप-बी आणि सीचे 80 हजार कर्मचारी आहेत.

बोसन पुरवण्यासाठी 56 कोटी रुपये खर्च येणार आहे. केजरीवाल म्हणाले की, कर्मचार्‍यांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत आणि ते यापुढेही सुरू राहतील.

काही दिवसांपूर्वी सीएम केजरीवाल यांनीही दिवाळीपूर्वी दिल्ली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली होती. दिल्ली महानगरपालिकेच्या 5,000 सफाई कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

यानंतर, हे कर्मचारी 2004 पासून कायम मानले जातील. दिवाळीनिमित्त मिळालेल्या या भेटीबद्दल स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

CM Devendra Fadnavis : ज्योती-सावित्री शाळेचे उद्‍घाटन; पुणे ‘झेडपी’ची संकल्पना राज्यभर

CSK vs DC Live: दिल्लीच्या १५ धावांत ४ विकेट्स! सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल, गुरजपनीतचा पहिल्याच चेंडूवर विक्रम; Video

Diesel Export Tax: मोठी बातमी! डिझेल आणि हवाई इंधन निर्यातीवर करात दुप्पट वाढ; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, जाणून घ्या नवे दर...

SCROLL FOR NEXT