Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal : ...म्हणून अरविंद केजरीवालांनी ईडी चौकशी टाळली; मध्य प्रदेशात प्रचारासाठी रवाना

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: ईडीने पाठविलेले समन्स राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगत आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणे टाळले. मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी सकाळी ११ वाजता हजर रहावे, असे समन्स ईडीने केजरीवाल यांना बजावले होते.

भाजपच्या सांगण्यावरून ईडीने समन्स दिल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. हे समन्स बेकायदा आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, त्यामुळे ते मागे घेतले जावे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. एकीकडे ईडीच्या नोटिशीला पत्राद्वारे उत्तर देतानाच केजरीवाल मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी निघून गेले.

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाऊ नये, यासाठी भाजपने कट रचला आहे, त्यामुळेच ईडीच्या माध्यमातून नोटीस देण्यात आली आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. मद्य धोरण प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच खासदार संजय सिंह हे दोन नेते आधीपासूनच तुरुंगात आहेत. दुसरीकडे केजरीवाल यांची या प्रकरणात गेल्या एप्रिल महिन्यात सीबीआयने चौकशी केली होती. त्यावेळी केजरीवाल यांना ५६ प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान ईडीकडून केजरीवाल यांना नव्याने नोटीस जारी केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आप नेते आणि केजरीवाल सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांच्या ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने छापेमारी केली आहे. सिव्हिल लाईन्समधील सरकारी निवासस्थानासह ९ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. आनंद यांच्या व्यवसायाशी संबंधित ही छापेमारी असून सीमा शुल्क प्रकरणासंदर्भात त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT