Arvind Kejriwal breaks silence on Swati Maliwal assault case, wants fair probe Esakal
देश

Swati Maliwal Case: स्वाती मालीवाल प्रकरणावर अरविंद केजरीवालांनी सोडलं मौन; म्हणाले 'घटनेच्या वेळी घरीच होतो पण…'

Swati Maliwal Case: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणावर आज (बुधवारी) पहिली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा आणि न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे, असे केजरीवाल म्हणाले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज(बुधवारी) आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावी आणि न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणालेत. तर स्वाती मालीवाल यांनी आरोप करत केजरीवाल यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

स्वाती मालीवाल यांनी आरोप केला आहे की, 13 मे रोजी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटण्यासाठी गेल्या असता केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बिभव कुमार यांना अटक केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केजरीवाल म्हणाले, 'सध्या हे प्रकरण विचाराधीन आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा कारवाईवर परिणाम होऊ शकतो.'

पुढे ते म्हणाले, “मला आशा आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल. न्याय मिळेल. या घटनेच्या दोन व्हर्जन आहेत. पोलिसांनी दोन्ही पक्षाची निष्पक्षपणे चौकशी करून न्याय द्यावा.”

पीटीआय या वृत्तसंस्थेने त्यांना घटनेच्या वेळी घरीच होते का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, ते घरीच होते परंतु ज्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत.

पीटीआयशी बोलताना त्यांनी पत्नीने निवडणूक लढविण्याच्या प्रश्नालाही उत्तर दिले. अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांची पत्नी सुनीता यांना राजकारणात रस नाही. भविष्यात त्या निवडणूक लढवणार नाहीत. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, जर इंडिया आघाडीने सरकार स्थापन केले तर ते न्यायव्यवस्थेला दबावातून मुक्त करेल आणि तुरुंगातून त्यांची सुटका सुनिश्चित करेल.

बिभव कुमार यांच्या फोनमधील डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू

मंगळवारी दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांच्या फोनमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी मुंबईला नेले. बिभववर अटकेपूर्वी फोन फॉरमॅट केल्याचा आरोप आहे. बिभव कुमारने आपल्या फोनमधील डेटा फॉरमॅट करण्यापूर्वी त्याचा फोन डेटा मुंबईतील एखाद्या व्यक्तीकडे किंवा डिव्हाइसला हस्तांतरित केल्याचा पोलिसांना संशय आहे. बिभव कुमार यांचा फोन आणि लॅपटॉप व्यतिरिक्त दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT