Arvind Kejriwal file photo
देश

घरपोच औषधे पुरवू; रुग्णालयांत येऊ नका - केजरीवालांचे आवाहन

लक्षणे सौम्य असल्याने नागरिकांनी सुरवातीची लक्षणे दिसताच रुग्णालयाकडे धाव घेऊ नये असे अवाहन केले.

सकाळ वृत्तसेवा

Delhi News : राजधानी दिल्लीतील (delhi) ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या (Omicron Patient) व संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राज्य सरकारची यंत्रणा संभाव्य संकटाला तोंड देण्यास तयार असल्याचे आज सांगितले. नव्या कोरोना व्हेरिएंटची (Corona Variant) लक्षणे सौम्य असल्याने नागरिकांनी सुरवातीची लक्षणे दिसताच रुग्णालयाकडे धाव घेऊ नये, घरीच उपचार घ्यावेत राज्य सरकार घरपोच औषधे पुरवेल असा दिलासाही त्यांनी नागरिकांना दिला.

मध्यंतरी राज्य सरकारने केलेल्या सिरो सर्वेक्षणात ९५ टक्के दिल्लीकरांना याआधीच संसर्ग होऊन गेल्याचे आढळून आले होते. दुसरे म्हणजे ९९ टक्के लोकांना किमान पहिले लसीकरण झाले आहे. ही परिस्थिती पाहता ओमिक्रॉनचे आक्रमण फार घातक ठरू नये अशी सरकारला आशा आहे. दुर्दैवाने तिसऱ्या लाटेचा उद्रेक झालाच तर सरकारी यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. सरकारने २ महिने पुरेल इतका औषधांचा साठा तयार ठेवला असल्याचेही केजरीवाल यांनी नमूद केले.

आमचे सरकार गृह विलगीकरणाचे एक सक्षम व मजबूत मॉडेल तयार करत आहे. त्यामुळे नागरिकांनी सौम्य लक्षणे दिसली तर लगेच रुग्णालयांत धाव न घेता घरीच विलगीकरणात राहून सुरवातीचे उपचार घ्यावेत. घरोघरी जाऊन चाचण्या करणाऱ्या पथकांमध्ये पुन्हा वाढ केली जाणार आहे.

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली

चाचण्यांच्या क्षमतेत वाढ

केजरीवाल म्हणाले की, ‘‘ ओमिक्रॉनचा विषाणू अत्यंत वेगाने पसरतो मात्र तो सौम्य आहे त्यामुळे फुफ्फुसांना फारशी क्षती पोचत नाही. राज्य सरकारने पायाभूत आरोग्य सुविधा मजबूत केल्या आहेत. सध्या रोज ६० ते ७० हजार चाचण्या होत आहेतच पण सरकारने रोज ३ लाख कोरोना चाचण्या करण्याची तयारी ठेवली आहे. दुसऱ्या लाटेची तीव्रता सर्वाधिक होती त्या काळात दिल्लीत रोज २५ ते २७ हजार रुग्णसंख्या आढळत होती. संभाव्य तिसऱ्या लाटेत रोज १ लाख नवे रुग्ण आढळून आले तरी त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यासाठीची क्षमता राज्य सरकारने सज्ज ठेवली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT