narayan rane  Sakal
देश

Arvind Kejriwal Video : नारायण राणेंच्या डोक्यावर बंदूक ताणली अन्...; केजरीवालांनी भर सभेत सुनावलं!

मोदी जेव्हा पंतप्रधान नसतील, तेव्हाच देश भ्रष्टाचारमुक्त होईल, असंही केजरीवाल म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

ज्या दिवशी मोदी पंतप्रधान नसतील, त्या दिवशी देश भ्रष्टाचारमुक्त होईल, असं विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. तसंच ईडी आणि सीबीआयने देशातल्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एका पक्षात एकत्र करून टाकलं आहे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी नारायण राणेंचाही उल्लेख केला आहे.

ईडी सीबीआयच्या भीतीने सगळे नेते भाजपामध्ये आल्याचंही केजरीवाल म्हणाले. नारायण राणेंचा उल्लेख करताना ते म्हणाले, "ईडी सीबीआयने नारायण राणेंच्या डोक्यावर बंदूक ताणली आणि विचारलं, ते म्हणाले भाजपामध्ये यायचंय. सुवेंदू अधिकारी, मुकुल रॉय यांच्या डोक्यावरही अशीच बंदूक होती. कारण त्यांनी घोटाळे केले होते. देशातले सगळे चोर एकाच पक्षात भाजपामध्ये आहेत. "

यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावला आहे. "मोदी आज पंतप्रधान आहेत, पण कधी ना कधी ते पायउतार होतीलच ना. ज्या दिवशी ते पायउतार होतील, त्या दिवशी देश भ्रष्टाचारमुक्त होतील. कारण चोर पकडण्यासाठी आता फारसे कष्ट पडणार नाहीत. ते सगळे एकाच खोलीत, एकाच पक्षात एकत्र आहेत", असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave Deaths : विदर्भात उष्णतेची भयंकर लाट ! नागपुरात उष्माघाताने एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू; IMD चा नागरिकांना इशारा

Aurangabad Accident: कामावरून घरी परतताना काळाचा घाला! लिंबेजळगावजवळ भीषण अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी अंत, महामार्गावर मृत्यूचा थरार..

Petrol-Diesel Rate: पेट्रोल-डिझेलच्या दरांत 4 दिवसांत दोनदा दरवाढ! काय आहे आजचे नवे दर?

Ratnagiri Blast: Ratnagiri सरपण गोळा करताना अनोळखी वस्तू दिसली, कुतुहलाने उचलताच झाला स्फोट; महिलेच्या हाताची बोटे तुटली

Walmik Karad: आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली; 'युरोसिस्टायटीस' नावाचा गंभीर आजार! तीन दिवसांपासून सलाईनवर, कारागृहातच...

SCROLL FOR NEXT