Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal : लग्नापूर्वीच अरविंद केजरीवालांनी पत्नीला विचारला होता 'हा' प्रश्न; खुद्द सुनीता केजरीवालांनी सांगितलं

''अरविंद केजरीवाल यांनी २०११ मध्ये आंदोलन केलं होतं. देशासाठी त्यांनी अमरण उपोषण केलं. जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी ४९ दिवसांमध्ये राजीनामा दिला होता. आजकाल कुणी शिपाईसुद्धा आपल्या नोकरीचा राजीनामा देत नाही.''

संतोष कानडे

AAP Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल लोकसभेच्या प्रचारात उतरल्या आहेत. त्या आता सार्वजनिक मंचावरुन थेटपणे केंद्रातल्या भाजप सरकारवर हल्लाबोल करीत आहेत.

इंडिया आघाडीच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या सभेला सुनीता केजरीवाल यांनी संबोधित केलं. त्या म्हणाल्या की, आज तुम्हाला एक गोष्ट सांगते, जी कुणालाच माहिती नाही. जेव्हा माझं लग्न ठरलं होतं, त्यावेळी त्यांचा (अरविंद केजरीवाल) एकच प्रश्न होता. त्यांनी विचारलं की, आयुष्यात मला समाजासाठी काम करायचं आहे.. तुला भविष्यात त्रास तर होणार नाही ना? अशा माणसाला या लोकांनी जेलमध्ये टाकलं आहे.

त्यांनी आयएएसची नोकरी सोडून दिली. २००६ मध्ये त्यांनी झोपडपट्टीमध्ये जाऊन काम केलं. त्यांनी नेहमीच समाजसेवेला प्राधान्य दिलं, त्यामुळेच नोकरी सोडली.

शिपाईसुद्धा नोकरी सोडत नाही- सुनीता केजरीवाल

सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांनी २०११ मध्ये आंदोलन केलं होतं. देशासाठी त्यांनी अमरण उपोषण केलं. जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी ४९ दिवसांमध्ये राजीनामा दिला होता. आजकाल कुणी शिपाईसुद्धा आपल्या नोकरीचा राजीनामा देत नाही.

अशा व्यक्तीला आज भाजपकडून त्रास दिला जात आहे. ते शुगरचे पेशंट आहेत तरी त्यांना इन्सुलिन दिलं जात नाहीये. अरविंद केजरीवालांच्या प्रत्येक घासावर कॅमेऱ्याची नजर आहे. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय, असाही आरोप सुनीता केजरीवाल यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT