Arvind Kejriwal sakal
देश

Arvind Kejriwal : केजरीवाल कोमात जाण्याची शक्यता;‘आप’चे खा. संजयसिंह यांचा दावा,भाजपकडून आरोपांचे खंडन

सध्या तिहार तुरुंगात कैद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होत असल्याने ते कोमात जाण्याची शक्यता असल्याचा दावा ‘आप’चे खासदार संजयसिंह यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सध्या तिहार तुरुंगात कैद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होत असल्याने ते कोमात जाण्याची शक्यता असल्याचा दावा ‘आप’चे खासदार संजयसिंह यांनी केला आहे. भाजपने मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे. प्रकृतीच्या कारणावरून ‘आप’ नेत्यांनी राजकारण करू नये असा उलटवार भाजपकडून करण्यात आला आहे.

तिहार प्रशासनाने सादर केलेल्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रकृतीच्या अहवालावरून ‘आप’चे खासदार संजयसिंह यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. ‘‘ गेल्या मार्च महिन्यापासून मुख्यमंत्री केजरीवाल हे मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. तिहार प्रशासनाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आरोग्य तपासणीनंतर त्यांचे वजन ८ किलोंनी घटले असल्याचे म्हटले असून त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण ५० पेक्षा कमी झाले आहे.

शरीरातील साखरेचे प्रमाण इतके कमी झाल्यास व्यक्ती कोमात जाण्याची शक्यता असते. यामुळे तिहार तुरुंगात केजरीवाल यांच्या जिवाला धोका आहे,’’ असे संजयसिंह यांनी नमूद केले. दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनीसुद्धा मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आरोग्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत केंद्र सरकार गंभीर नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘आप’ने राजकारण करू नये : भाजप

‘आप’च्या नेत्यांचे आरोप मात्र भाजपने फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जात आहे. यावेळी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल सुद्धा उपस्थित राहत आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेतली जात आहे. परंतु आपचे नेते आरोग्यावरून राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT