Wrestler Protest
Wrestler Protest esakal
देश

Wrestler Protest : अरविंद केजरीवालांनी घेतली आंदोलनकर्त्या महिला पैलवानांची भेट, म्हणाले...

संतोष कानडे

नवी दिल्ली : ऑलिम्पिकपटू महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात काल पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांसह महिला खेळाडूंना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल दुसरा विनयभंगाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

आज या आंदोलकांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. विनेश फोगाट, बजरंग पूनिया, साक्षी मलिकसह धरणे आंदोलनासाठी बसलेल्या महिलांशी केजरीवाल यांनी चर्चा केली. यावेळी केजरीवाल म्हणाले की, संपूर्ण जगात देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडू देशाच्या मुली आहेत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.आरोपी कितीही शक्तिशाली असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

बृजभूषण सिंह यांच्यावरील पहिला एफआयआर अल्पवयीन पीडित महिला खेळाडूनं केलेल्या आरोपांशी संबंधित आहे. ज्यासाठी त्यांच्यावर POCSO कायद्यांतर्गत विनयभंगा संबंधित IPCचं कलम लावण्यात आलं आहे. इतर, प्रौढ महिला खेळाडूंनी केलेल्या तक्रारींची सर्वसमावेशक चौकशी करण्यासाठी दुसरा एफआयआर विनयभंगाशी संबंधित कलमांतर्गत नोंदवला आहे, असं पोलीस उपायुक्त प्रणव दयाल यांनी काल सांगितलं.

खेळाडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही शनिवारी सकाळी जंतरमंतरवर जात खेळाडूंची भेट घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुडाही होते. जंतरमंतरवर खेळाडूंच्या धरणे आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Party Anniversary : मुंबईमध्ये आवाज कुणाचा? दोन्ही शिवसेना आज वर्धापनदिनाला करणार शक्तिप्रदर्शन

Wayanad Loksabha Election : वायनाडवरून काँग्रेस-भाजपमध्ये वाक्‌युद्ध; भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीचा केला आरोप

BJP Party : नेतृत्वबदल नाहीच! भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय

Sunil Tatkare : ‘राष्ट्रवादी’चे आमदार अजित पवारांसोबत

OBC Reservation : चर्चेसाठी शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही - लक्ष्मण हाके

SCROLL FOR NEXT